Does Drinking Saffron Milk Make Babies Fair : महिलेसाठी आई होणं हे जगातील सर्वात मोठं सुख असतं.गर्भधारणेचा काळ हे प्रत्येक महिलेसाठी खूप महत्त्वाचा आणि खास असतो. एखाद्या महिला जेव्हा गूड न्यूज देते तेव्हा सगळ्यात पहिली प्रतिक्रिया येते ती म्हणजे आता स्वत:ची काळजी घे आणि हे पदार्थ खा ते पदार्थ यामुळे बाळ निरोगी होईल.
प्रत्येक आईला वाटतं आपलं बाळ निरोगी आणि गोरं असावं मग आजी आणि आईकडून सांगण्यात येते की केसरयुक्त दूध घे, यामुळे बाळ गोरपान होतं. पण खरंच केशर दूध प्यायल्याने बाळ गोर होतं का? यामागे खरंच काय सत्य आहे याला काही वैज्ञानिक कारण आहे का? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आज आपण यासंदर्भात Fact Check करणार आहोत.
बाळाचा रंग हा गोरा की काळा हे मेलॅनिनच्या पातळीवर अवलंबून असतं, असं स्टार हॉस्पिटलचे स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ज्ञ डॉ. विजय लक्ष्मी यांनी माहिती दिली आहे. शरीरातील मेलेनिनच्या उच्च पातळीमुळे बाळाची त्वचा काळी होते तर मेलेनिनचे प्रमाण संतुलित असेल तर त्वचेचा रंग हा पांढरा असतो. बाळ गोरा होण्यासाठी केशर खाणे किंवा केशर दूध पिणे फायदेशीर आहे याचा कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.
केशरमध्ये असलेले औषधी गुणधर्म आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याने गरोदरपणात केशर खाणे चांगले मानले जातं.गरोदरपणात केशर खाल्ल्याने महिलांचा तणाव कमी होतो आणि मूड स्विंगच्या समस्येतही फायदा होतो. गर्भवती महिलांनी दररोज संतुलित प्रमाणात केशर खाल्ल्याने फायदा होतो.प्रसूतीदरम्यान होणारा त्रास कमी करण्यासाठी केशर खाणे देखील फायदेशीर आहे. मात्र काही संशोधना आणि अभ्यास अशीही माहिती समोर आली आहे की, गरोदरपणात केशर खाल्ल्याने गर्भपात होण्याचा धोकाही वाढतो.म्हणून गरोदरपणात केशर जास्त प्रमाणात खाणे टाळावे.गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत जास्त केशर खाल्ल्याने अनेक समस्या उद्भवू शकतात.त्यामुळे गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय केशरचे सेवन करू नये.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया या माहितीचा वापर करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. Zee 24 Tass या माहितीची खातरजमा करत नाही.)