मुंबई : केसांमुळे सौंदर्यात भर पडते. लांबसडक, काळेभोर, घनदाट केस सर्वांनाच आवडतात. तसे केस आपलेही असावे, असे अनेकींना वाटते. यासाठी अनेक उपाय केले जातात. पण केस वाढल्यानंतर ते ट्रिम करण्याच्या नादात खूप कमी होतात. आणि मग आपण आपले मोठे, लांब केस मिस करतो. परंतु, या काही सोप्या ट्रिक्सने तुमचे केस काहीसे लांब दिसण्यास मदत होईल.
पोनीटेलमुळे तुमचे केस काहीसे लांब व जाड दिसण्यास मदत होईल. पोनी काहीसा वर बांधल्याने केसांची लांबी जास्त भासेल.
मधला भांग पाडल्याने केस लांब वाटतील. एका बाजूने भांग पाडल्यास केस दाट वाटतात तर मधल्या भांगामुळे केस लांब व पातळ भासतात.
केस स्ट्रेट केल्याने ते नेहमीपेक्षा लांब दिसतात. कर्ल, वेव्ह केल्याने त्यांची लांबी खूप कमी दिसते.
यापैकी कशाचाच फायदा झाला नाही तर गळ्याभोवती असणारे टी शर्ट्स, कपडे घाला. उदा. crew-neck. त्यामुळे केस लांब दिसण्यास मदत होईल.
केसांचा व्हॉल्युम वाढवल्यास केस लांब व दाट दिसतात. यासाठी केस आतल्या बाजूला वळवा आणि ब्लो ड्राय करा.