कोरोना महामारीनंतर जगाला आणखी एका साथीचा धोका आहे. हा आजार कोरोनापेक्षा 100 पट जास्त प्राणघातक ठरू शकतो. जागतिक तज्ज्ञांना बर्ड फ्लूच्या साथीची भीती वाटत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बर्ड फ्लू हा आजार कोविड-19 संकटापेक्षा अधिक विनाशकारी असू शकते. विशेष गोष्ट अशी आहे की, या महामारीमध्ये H5N1 स्ट्रेन विशेषत: गंभीर धोका निर्माण करू शकतो. व्हायरस संशोधकांनी नुकत्याच दिलेल्या ब्रीफिंगनुसार, H5N1 जागतिक साथीच्या रोगाला तोंड देण्याच्या 'धोकादायकपणे जवळ' येत असल्याचे संकेत दिले आहेत.
बर्ड फ्लूला एव्हियन इन्फ्लूएंझा असेही म्हणतात. एव्हीयन इन्फ्लूएंझा किंवा बर्ड फ्लू हा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे. जो घरगुती आणि जंगली दोन्ही पक्ष्यांना प्रभावित करतो. हा इन्फ्लूएन्झा विषाणू इतका धोकादायक आहे की, त्यामुळे मनुष्य आणि पक्ष्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. हा एव्हियन इन्फ्लूएंझा (H5N1) विषाणू आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हा रोग इन्फ्लूएंझा प्रकार ए विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य विषाणूजन्य रोग आहे. जर एखादा माणूस किंवा पक्षी बर्ड फ्लूच्या विषाणूच्या संपर्कात आला तर त्याला संसर्ग होऊ शकतो.
(हे पण वाचा - H5N1 Bird Flu: बर्ड फ्लू माणसात पसरतोय? कोरोनापेक्षा 100 पटीने खतरनाक)
ताप येणे
स्नायू आणि सांधेदुखी
सतत सर्दी होणे
कफाची समस्या
डोकेदुखी
कफ
ओटीपोटात वेदना जाणवणे
डोळ्याची लालसरपणा (नेत्रश्लेष्मलाशोथ)
अतिसार होणे
मळमळ किंवा उलट्या झाल्यासारखी भावना
घशात सूज येणे
संक्रमित कोंबडी किंवा इतर पक्ष्यांच्या संपर्कात राहून
संक्रमित पक्ष्यांचे मांस (कच्चे मांस) सेवन केल्याने
संक्रमित पक्ष्यांची साफसफाई करताना
संक्रमित पक्ष्याने ओरखडे घेतल्याने
संक्रमित पक्ष्यांची विष्ठा असलेल्या पाण्याने आंघोळ करावी
संक्रमित पक्षी असलेल्या वातावरणात श्वास घेणे
पोल्ट्री फार्ममध्ये काम करणाऱ्या लोकांना धोका