महिलांच्या ओटीपोटात दुखण्यामागे मासिक पाळीच नाही, तर 'या' गोष्टी असू शकतात कारणीभूत

महिलांना पोटदुखीची समस्या फक्त मासिक पाळीतमुळेच उद्भवत नाही.

Updated: Apr 28, 2022, 10:11 PM IST
महिलांच्या ओटीपोटात दुखण्यामागे मासिक पाळीच नाही, तर 'या' गोष्टी असू शकतात कारणीभूत  title=

मुंबई : जेव्हा जेव्हा महिलांना पोटदुखीची समस्या होते तेव्हा बहुतेक लोकांना असे वाटते की, मासिक पाळीमुळे त्यांच्या पोटात दुखत आहे, परंतु हे लक्षात घ्या की, फक्त मासिक पाळीतमुळेच पोट दुखतं असं नाही.  अनेक कारणांमुळे महिलांच्या ओटीपोटात वेदना होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया अशी कोणती कारणे आहेत, ज्यामुळे महिलांच्या मासिक पाळी व्यतिरीक्त पोटात दुखते.

बर्‍याच वेळा स्त्रियांना ओव्हेरियन सिस्ट प्रॉबलममुळे पोट फुगणे, अनियमित मासिक पाळी न येणे, खालच्या ओटीपोटात दुखणे अशा समस्या उद्भवतात.

वास्तविक, महिलांच्या अंडाशयातील ओवेरियन सिस्ट पिशवी फुटल्यामुळे देखील अशा समस्या उद्भवू शकतात. यासाठी सर्वात आधी डॉक्टरांशी संपर्क साधा.

खरंतर ओवेरियन सिस्ट ही एक तरळ पदार्थांची पिशवी आहे. जी महिलांच्या अंडाशयांमध्ये असते. यामुळे यूटीआयमध्ये मूत्रपिंड, गर्भाशय, मूत्राशय, मूत्रमार्गाचा संसर्ग होतो. पुरुषांपेक्षा महिलांना या समस्येचा सामना करावा लागतो. या समस्येमध्ये महिलांच्या खालच्या ओटीपोटात दुखू शकते.

याशिवाय, गर्भपातामुळे देखील पोटा दुखू शकतात. यामुळे पोटाच्या खालच्या भागात दुखणे, खूप रक्तस्राव होणे, पाठदुखी, ताप, पेटके इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)