सेरेब्रल पाल्सी आजारग्रस्ताना आशेचा किरण...

सेरेब्रल पाल्सी Cerebral Palsy (CP) अर्थात मेंदूचा पक्षाघात हा आजार लहान मुलांमध्ये जन्मजातच असतो. या आजाराचे प्रमाण आपल्या भारतात दिवसेंदिवस वाढत चालले आहे.  

Updated: Oct 6, 2020, 03:22 PM IST
सेरेब्रल पाल्सी आजारग्रस्ताना आशेचा किरण...

मुंबई : सेरेब्रल पाल्सी Cerebral Palsy (CP) अर्थात मेंदूचा पक्षाघात हा आजार लहान मुलांमध्ये जन्मजातच असतो. या आजाराचे प्रमाण आपल्या भारतात दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या रोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी ६ ऑक्टोबर हा जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन पाळला जातो. दरम्यान,  हा आजार गंभीर स्वरूपाचा असला तरी योग्य वेळी उपचार केल्यास निश्चितच चांगले बदल दिसून येतात. त्यामुळे निराश न होता औषधोपचार, आहार व व्यायाम या गोष्टींमध्ये सातत्य ठेवल्यास आपण सेरेब्रल पाल्सिग्रस्त बाळाला चांगले आयुष्य नक्कीच देवू शकतो. स्टेमसेल्स थेरपी सारख्या उपचार पध्दतीमुळे अशा गंभीर आजाराशी लढण्यास फायदेशीर ठरते.

सेरेब्रल पाल्सीची कारणे 

आज जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन (World Cerebral Palsy Day ) आहे. दरवर्षी ३००० बालकांमागे ३ मुलं सेरेब्रल पाल्सी आजाराने त्रस्त आहेत. सेरेब्रल पाल्सी हे भारतातल्या लहान मुलांमध्ये अपंगत्व येण्याचे मुख्य कारण आहे. सेरेब्रल पाल्सी होण्याच्या मागे अनेक बाबी कारणीभूत आहेत. सेरेब्रल पाल्सी होण्याची काही कारणे अशी आहेत प्रसुती दरम्यान आईला झालेला संसर्ग, काही औषधांचे सेवन, गंभीर जखमा ही प्राथमिक कारणे असू शकतात. त्याचबरोबर मुदतीआधी जन्मलेले अपत्य, जन्माच्यावेळी अपत्याचे वजन कमी असणे, मूल उशिरा रडणे, जन्मताना झालेल्या जखमा, एकावेळी अनेक मुलांचा जन्मही सेरेब्रल पाल्सीची कारणे असू शकतात. 

प्राणवायूची कमतरता, कावीळ, सीझर किंवा मेंदूत पाणी जमा होणे यामुळेही सेरेब्रल पाल्सी होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी जन्माला येणाऱ्या एक बालकांमधील तीन ते पाच जणांना सेरेब्रल पाल्सी हा रोग होतो.

काय होतात परिणाम?

सेरेब्रल पाल्सी असणारे मूल स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवू शकत नाही. तसेच त्यांच्या हाताच्या तसेच पायांच्या स्नायूंमध्ये ताठरता वाढते. जरी हा प्राथमिकदृष्ट्या हालचालींवर मर्यादा आणणारा विकार असला तरी मेंदूतील ज्या भागावर हा परिणाम घडवतो, त्यानुसार रुग्णाच्या आकलनक्षमता, शिकणे, बुद्धी, स्वभाव, संवाद, वाचा, संवेदना, श्रवण तसेच दृष्टीवर परिणाम घडवतो. युगांडा येथे राहणाऱ्या आरोन या बाळाच्या जन्मापूर्वी त्याच्या आईला प्रदीर्घ प्रतिक्षा करावी लागली. जन्मानंतर हे बाळ रडले नाही ना त्या बाळाने शारीरीक हलचाली केल्या, अशावेळी या बाळाला एनआयसीयुमध्ये दाखल करण्यात आले. तीन आठवडे या बाळावर झालेल्या उपचारानंतर त्याच्या प्रकृतीमध्ये काहीशी सुधारणा झाली. तपासणीदरम्यान बाळाला सेरेब्रल पाल्सी आजाराचे निदान झाले. यानंतर हे बाळ मुंबईतील रिजनरेटीव्ह मेडिसिन रिसर्चर डॉ. प्रदीप महाजन यांच्याकडे पुढील उपचारासाठी दाखल झाले. डॉक्टरांनी या बाळावार स्टेमसेल्स थेरपीसारख्या उपचार पध्दतीचा अवलंब करत यशस्वी उपचार केले.

रिजनरेटीव्ह मेडिसिन रिसर्चर डॉ. प्रदीप महाजन सांगतात, सेरेब्रल पाल्सी असणारे मूल स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवू शकत नाही. तसेच त्यांच्या हाताच्या तसेच पायांच्या स्नायूंमध्ये ताठरता वाढते. जरी हा प्राथमिकदृष्ट्या हालचालींवर मर्यादा आणणारा विकार असला तरी मेंदूतील ज्या भागावर हा परिणाम घडवतो, त्यानुसार रुग्णाच्या आकलनक्षमता, शिकणे, बुद्धी, स्वभाव, संवाद, वाचा, संवेदना, श्रवण तसेच दृष्टीवर परिणाम घडवतो. 

योग्य वेळी उपचार केल्यास...

हा आजार गंभीर स्वरूपाचा असला तरी योग्य वेळी उपचार केल्यास निश्चितच चांगले बदल दिसून येतात. त्यामुळे निराश न होता औषधोपचार, आहार व व्यायाम या गोष्टींमध्ये सातत्य ठेवल्यास आपण सेरेब्रल पाल्सिग्रस्त बाळाला चांगले आयुष्य नक्कीच देवू शकतो. स्टेमसेल्स थेरपी सारख्या उपचार पध्दतीमुळे अशा गंभीर आजाराशी लढण्यास फायदेशीर ठरते. या मुलांमध्ये आनंद, उत्साह, आत्मविश्वास भरण्याची गरज आहे. दैनंदिन जीवनात व्यायाम, पोषक आहाराचा समावेश करणेही तितकेच गरजेचे आहे.