World Hypertension Day 2023 : जगभरात उच्च रक्तदाब म्हणजे हाय बीपीची (High BP Causes) समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे चारपैकी एकाला उच्च रक्तदाब असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे दरवर्षी 17 मे हा दिवस जागतिक उच्च रक्तदाब किंवा वर्ल्ड हायपरटेन्शन डे (World Hypertension Day) म्हणून पाळला जातो. या दिवशी लोकांमध्ये उच्च रक्तदाबाबत जनजागृती केली जाते. (hypertension awareness day)
उच्च रक्तदाबामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. हायपरटेन्शनपासून हृदय (Heart), किडनीवरही (kidney) याचा परिणाम होतो. अगदी उच्च रक्तदाबामुळे मधुमेहाचाही (Diabetes) धोका निर्माण होतो. मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांचा काय संबंध आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. (world hypertension day 2023 What is the relationship between diabetes and high blood pressure or hypertension health news in marathi )
संवहनी शस्त्रक्रिया विभाग, मेदांता- द मेडिसिटीचे अध्यक्ष डॉ. राजीव पारीख यांनी सांगितलं आहे की, उच्च रक्तदाबाचा आणि मधुमेहाचा यांचा घनिष्ठ संबंध आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांना उच्च रक्तदाबाचा धोका सर्वाधिक असतो. ज्या व्यक्तीला मधुमेहाचा त्रास आहे त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. अशा परिस्थितीत रक्तवाहिन्या या आकुंचन पावतात. याचा परिणाम त्या व्यक्तीला हाय बीपीचा त्रास होतो.
मधुमेहामुळे किडनीवरही परिणाम दिसून येतो. मधुमेहामुळे किडनीच्या नसाही आकुंचित होतात. त्यामुळे त्यांच्यावरील दाब वाढतो, नसांवर ताण येतो. याचा परिणाम त्या व्यक्तीचा रक्तदाब वाढू लागतो.
हाय बिपीमुळे हायपरटेन्शचा सर्वाधिक धोका आहे. युनायटेड स्टेट्सनुसार पाच जणांच्या मृत्यूच्या कारणामध्ये एक कारण हायपरटेन्शमुळे होतो. उच्च रक्तदाब नियंत्रणात राहिला नाही तर मेंदूच्या रक्तवाहिन्यांवर त्याचा गंभीर परिणाम दिसून येतो. यामुळे व्यक्तीच्या जीवही जातो.
उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडावरही (kidney infection) परिणाम होतो. हाय बीपीमुळे मूत्रपिंडांला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या खराब होतात. त्यामुळे मूत्रपिंडाचे आजाराशिवाय मूत्रपिंड निकामी होण्याची समस्या होते.
तज्ज्ञांनुसार उच्चरक्तदाबाची ठळक अशी लक्षणं दिसत नसतात. पण साधारणपणे वारंवार डोकेदुखी, चक्कर येणे, थकवा, आळसपणा, झोप न लागणे, हृदयाचे ठोके वाढणे आणि छातीत दुखणे अशी साधारण लक्षणं दिसून येतात.