केस गळतीवर उपयुक्त 'हे' योगासन

चिंता, हार्मोन्सचे असंतुलन, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी आणि वेळा हे केसगळतीचे प्रमुख कारण आहे.

Updated: Jun 20, 2019, 05:12 PM IST
केस गळतीवर उपयुक्त 'हे' योगासन  title=

मुंबई :  चिंता, हार्मोन्सचे असंतुलन, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी आणि वेळा हे केसगळतीचे प्रमुख कारण आहे. पण यावर योगसाधना हा एक उत्तम उपाय आहे. यामुळे केसांपर्यंत रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे होतो आणि मानसिक ताण, भूक न लागण्याची समस्या, चिंता यापासून सुटका होते. 

भुजंगासन
वारंवार पित्त होणे हे देखील केसगळती एक महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे पित्त नियंत्रित ठेवण्यासाठी भुजंगासन खूप फायदेशीर ठरते. 

पवनमुक्तासन
या आसनामुळे पोटातील गॅस दूर होवून पचनशक्ती सुधारते. कंबरच्या खालचे स्नायू मजबूत होतात. 

वज्रासन
वज्रासन ही एक धानात्मक स्थिती आहे. यामुळे मूत्रासंबंधित समस्या, पोटातील गॅस दूर होण्यास मदत होते. अन्नाचे पचन चांगल्या प्रकारे होते. त्याचबरोबर वजन कमी करण्यास मदत होते.  

अधोमुख शवासन
या आसनामुळे शरीरभर रक्तसंचार सुरळीत होतो. डोक्याला रक्ताचा उत्तम पुरवठा होवून थकवा दूर होतो. निद्रानाशाचा त्रास दूर होण्यासही हे आसन फायदेशीर ठरते. 

सर्वांगासन
या आसनामुळे थॉयरॉईड ग्रंथीचे पोषण होते. यामुळे पचनतंत्र सुधारते. डोक्याच्या दिशेने रक्तप्रवाह होतो. त्यामुळे केसगळती, केस अकाली पांढरे होण्याची समस्या कमी होण्यास मदत होते.