नाभीत या तेलांचे थेंब टाकणे अनेक समस्यांवर परिणामकारक!

नाभी हे आपल्या शरीरातील केंद्र बिंदू आहे.

Updated: May 1, 2018, 12:46 PM IST
नाभीत या तेलांचे थेंब टाकणे अनेक समस्यांवर परिणामकारक!

मुंबई : नाभी हे आपल्या शरीरातील केंद्र बिंदू आहे. नाभीचा थेट संबंध चेहऱ्याशी असतो. तसंच केंद्रबिंदू असल्याने अनेक समस्या नाभीपासून दूर होतात. त्यामुळे तुम्हाला या काही समस्या असल्यास जरुर करुन पहा हे उपाय...
तुम्हाला खूप पिंपल्स येतात का? आणि अनेक उपाय करुनही ते दूर होत नाहीत? मग हा सोपा उपाय करुन बघा. खूप पिंपल्स येत असल्यास नाभीमध्ये कडूलिंबाचे तेल घाला. असे नियमित केल्यास काही दिवसातच पिंपल्स गायब होतील.

  • ज्या महिलांना मासिक पाळीच्या काळात खूप त्रास होतो. त्यांनी कापसाच्या बोळा ब्रांडीमध्ये बुडवून नाभीजवळ लावा. काही वेळात त्रास दूर होईल.
  • ओठ खूप फाटत असल्यास मोहरीचे तेल नाभीला लावा. त्यामुळे ओठ फाटण्याची समस्या दूर होईल.
  • चेहरा चमकदार होण्यासाठी बदामाचे तेल नाभीवर लावा. नियमित हा उपाय केल्याने चेहऱ्यावर चमक येईल.
  • खाज येणे, चकत्या पडणे अशा समस्या असल्यास कडूलिंबाचे तेल नाभीवर लावणे फायदेशीर ठरेल.
  • चेहऱ्यावर डाग असल्यास लिंबाचे तेल नाभीत घाला. लवकर फायदा होईल.