विधवा वहिनीसोबत जबरदस्ती लग्न लावल्याने १५ वर्षीय मुलाची आत्महत्या

आपल्यापेक्षा वयाने दहा वर्षाने मोठ्या विधवा वहिनीसोबत जबरदस्तीने लग्न लावल्यानंतर १५ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 15, 2017, 05:08 PM IST
विधवा वहिनीसोबत जबरदस्ती लग्न लावल्याने १५ वर्षीय मुलाची आत्महत्या title=

नवी दिल्ली : आपल्यापेक्षा वयाने दहा वर्षाने मोठ्या विधवा वहिनीसोबत जबरदस्तीने लग्न लावल्यानंतर १५ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

बिहारमधील गया जिल्ह्यात ही घटना घडली आहे. १५ वर्षीय मुलाने आपल्याच घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सतीश दास आणि रुबी देवी यांचा २००९ साली विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा आणि मुलगी असे दोन आपत्य आहेत. सतीश एका कंपनीत इलेक्ट्रिशयन म्हणून काम करत होता. २०१३ साली त्याला करंट लागल्याने मृत्यू झाला. 

सतीशचा मृत्यू झाल्याने कंपनीने त्याच्या परिवाराला ८०,००० रुपयांची आर्थिक मदत केली. हे पैसे आपल्या मुलीला मिळावे यासाठी रुबी आणि तिच्या आई-वडीलांनी सतीशच्या नातेवाईकांकडे मागणी केली. तसेच हे पैसे देण्यास नकार दिला तर सतीशच्या लहान भावाचं लग्न रुबीसोबत लावण्याची मागणी रुबीच्या आई-वडीलांनी केली. 

त्यानुसार, १५ वर्षीय मुलासोबत रुबीसोबत लग्न लावण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी (११ डिसेंबर) रोजी रुबी आणि सतीशच्या लहान भावासोबत लग्न लावण्यात आलं. मात्र, या लग्नाचा मानसिक परिणाम सतीशच्या भावावर झाला आणि त्याने गळफास घेत आत्महत्या केली.