मुंबई : देशातील कोरोनाव्हायरस (Coronavirus) संसर्गाची परिस्थिती अनियंत्रित आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. असे असूनही, राजधानी दिल्लीत एक अतिशय वाईट बातमी समोर आली जिथे सर गंगाराम रुग्णालयात गेल्या 24 तासात 25 रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, ऑक्सिजनअभावी (Oxygen) ज्या 60 जीवांना जीव धोक्यात आला होता. मात्र, आता ऑक्सिजनची गाडी पोहोचल्याने धोका टळला आहे.
देशात कोरोनाचा हाहाकार दिसून येत आहे.(Coronavirus in India) त्यातच आता रुग्णालयात मोठ्या दुर्घटना घडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रात नाशिक आणि विरार येथील रुग्णालयात दुर्घटना घडल्यानंतर आता दिल्लीमधील गंगाराम रुग्णालयात (Sir Ganga Ram Hospital) उपचार सुरु असलेल्या 25 गंभीर रुग्णांचा गेल्या 24 तासात मृत्यू झाला आहे. रुग्णालयाकडूनच ही माहिती देण्यात आली आहे. सकाळी 8 वाजता रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या दोन तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक आहे. सरकारच्या आवाहनानंतर ऑक्सिजनची गाडी दाखल झाली आहे. (25 sickest patients have died in last 24 hrs at Sir Ganga Ram Hospital)
25 sickest patients have died in last 24 hrs at the hospital. Oxygen will last another 2 hrs. Ventilators & Bipap not working effectively. Need Oxygen to be airlifted urgently. Lives of another 60 sickest patients in peril: Director-Medical, Sir Ganga Ram Hospital, Delhi
— ANI (@ANI) April 23, 2021
दिल्लीमधील गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजनवर असणाऱ्या 60 हून अधिक रुग्णांचा जीव धोक्यात आहे. सूत्रांच्या माहिनुसार, ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. अनेक राज्यांप्रमाणे दिल्लीतही अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले आहे. गंगाराम रुग्णालय हे दिल्लीमधील खासगी रुग्णालयांमध आहे. 675 बेड्सचे प्रसिद्ध रुग्णालय आहे. या रुग्णालयातही ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजन अभावी गेल्या 24 तासात 25 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.
Delhi: Oxygen tanker arrives at Sir Ganga Ram Hospital in the national capital after the hospital sends SOS pic.twitter.com/MLDiFm6vmq
— ANI (@ANI) April 23, 2021
विशेष म्हणजे, हॉस्पिटल प्रशासनाने दोन तासांत ऑक्सिजन (Oxygen) कमी होण्याविषयी माहिती दिली होती. रुग्णालयाने पाठविलेल्या आपत्कालीन संदेशामध्ये ऑक्सिजनची (Oxygen) त्वरित आवश्यकता असल्याचे सांगितले होते. हॉस्पिटलमध्ये काही तासांकरिता केवळ ऑक्सिजन शिल्लक आहे. अशा परिस्थितीत आपत्कालीन व्यवस्थेकडे वेळीच याबाबत मागणी केली होती. ही मागणी आता पूर्ण झाल्याने 60 रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.