बंगळुरु : कर्नाटक निवडणुकीत 222 जागांसाठी आज मतदान पार पडलं. शनिवारी संध्याकाळी 6 वाजता मतदान पूर्ण झालं. या निवडणुकी भाजप जर विजयी झाला तर याचे 5 फायदे आणि पराभूत झाला तर 5 नुकसान काय होणार हे जाणून घेऊया.
1. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये यावर्षी विधानसभेसाठी निवडणुका होणार आहे. याचा फायदा भाजपला होईल.
2. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मोदींच्या विजयाची शक्यता वाढेल
3. मोदींच्या काळात दक्षिणात पहिलं सरकार बनेल.
4. लिंगायत समाजाला वेगळा धर्म बनवणं चूक ठरेल आणि पुढे हिंदू धर्मापासून वेगळा धर्म बनवण्याचा प्रयत्न नाही होणार.
5. याआधी मुख्यमंत्री म्हणून स्वतंत्रपणे काम करणारे येदुरप्पा यानंतर केंद्रीय नेतृत्वाच्या हिशोबाने काम करतील.
1. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप पुढच्या अडचणी वाढतील.
2. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विजयाचा सिलसिला तुटले. विरोधी पक्ष एकत्र येतील.
3. वी एस येदुरप्पा यांचं राजकीय भवितव्य संपुष्टात येईल.
4. चंद्रबाबू नायडू याआधीच एनडीए सरकारमधून बाहेर पडले आहेत. शिवसेना देखील टीका करत आहे पण यानंतर इतर पक्ष देखील उघड टीका करतील.
5. दक्षिण भारतात भाजपला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागेल.