६ वीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न....

उत्तर प्रदेशात सहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनींचे अपहरण करून बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 1, 2017, 12:38 PM IST
६ वीत  शिकणाऱ्या मुलीवर बलात्काराचा प्रयत्न.... title=

नोएडा : उत्तर प्रदेशात सहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनींचे अपहरण करून बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ११ वीत शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

जेवर पोलीस स्टेशनचे प्रभारी राजपाल सिंह तोमर यांनी या संदर्भात मीडियाशी बोलताना सांगितले की, "पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपातून आरोपी मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे." पीडित  मुलगी बाजारात जात असताना तिचे अपहरण करण्यात आले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी मुलगा हा पीडित मुलीच्या शेजारी राहतो. ११ वीत शिकणाऱ्या या मुलाने बाजारात जायला निघालेल्या मुलीला जबरदस्ती आपल्या घरात नेले आणि जनावरांच्या तबेल्यात बांधून ठेवले. मुलगी परत न आल्याने मुलीच्या आई वडीलानी पोलीसात तक्रार दाखल केली. 

त्यानंतर आरोपीने मुलीला सोडून दिले. घरी आल्यानंतर पीडितेने झालेला प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. मात्र आरोपीचे म्हणणे अजून समोर आलेले नाही.