Brokerage Picks : दिग्गज ब्रोकरेज हाऊसने या 6 शेअरमध्ये गुंतवला पैसा; छप्परफाड कमाईची तुम्हालाही संधी

रोजच्या प्रमाणे दिग्गज ब्रोकरेज हाऊसने आपल्या रिसर्चच्या आधारे काही शेअर्समध्ये विक्रीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाउसच्या नजरेत ज्या शेअर्सचे फंडामेंटल मजबूत आहे त्यांमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला जातो. अन् ज्या शेअरचे फंडामेंटल्स कमजोर आहेत. त्याच्यांत विक्रीचा सल्ला दिला जातो.

Updated: Aug 2, 2021, 03:25 PM IST
Brokerage Picks : दिग्गज ब्रोकरेज हाऊसने या 6 शेअरमध्ये गुंतवला पैसा; छप्परफाड कमाईची तुम्हालाही संधी title=

मुंबई : रोजच्या प्रमाणे दिग्गज ब्रोकरेज हाऊसने आपल्या रिसर्चच्या आधारे काही शेअर्समध्ये विक्रीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेज हाउसच्या नजरेत ज्या शेअर्सचे फंडामेंटल मजबूत आहे त्यांमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला जातो. अन् ज्या शेअरचे फंडामेंटल्स कमजोर आहेत. त्याच्यांत विक्रीचा सल्ला दिला जातो.

तुम्ही देखील शेअर बाजारात गुंतवणूकीसाठी इक्विटी शेअर्सच्या शोधात असाल तर,  यादी तयार आहे. आम्ही या 6 स्टॉकची माहिती देत आहोत.

Bhandhan Bank
Bhandhan Bank मध्ये जेपी मॉर्गनने ओवरवेट रेटिंग दिली आहे. त्यासाठी 390 रुपयांचे लक्ष दिले आहे. गोल्डमॅननेदेखील या शेअरमध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 447 रुपयांचे लक्ष ठेवले आहे. बर्नस्टाइनने आऊटपरफॉर्मची रेटिंग दिली आहे. त्यासाठी 300 रुपयांचे लक्ष ठेवले आहे. ब्रोकरेज हाऊसच्या अनुसार एसेट क्वालिटीवर थोडा दबाव आहे. बँकेचा नफा 27.9 ने कमी होऊन 373.1 कोटी रुपये इतका आहे.

Sunpharma
फार्मा कंपनी Sunpharma बाबतीत ब्रोकरेज हाऊस पॉझिटिव्ह आहेत. CLSA ने शेअर खरेदी करण्याच सल्ला दिला आहे. त्यासाठी 960 रुपयांचे लक्ष दिले आहे. ब्रोकरेज हाऊस जेपी मार्गनने आऊटपरफॉर्म रेटिंग दिली आहे.  आणि लक्ष 850 रुपये ठेवले आहे. गोल्डमॅनने या शेअरमध्ये विक्रीचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 600 रुपयांचे लक्ष ठेवले आहे. क्रेडिट सूईस अडरपरफॉर्मची रेटिंग देताना 640 रुपयांचे लक्ष दिले आहे. पहिल्या तिमाहीमध्ये 1444 कोटी  रुपयांचा नफा झाला आहे. 

Britannia Industries
Britannia Industries मध्ये मैक्वायरीने न्युट्रल रेटिंग दिली आहे. तसेच या शेअरसाठी 3600 रुपयांचे लक्ष दिले आहे. Citi नेसुद्धा खरेदीचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 3925 रुपयांचे लक्ष ठेवले आहे.

UPL
ब्रोकरेज हाऊस CLSA ने UPL मध्ये खरेदीचा सल्ला दिला आहे. यामद्ये 1000 रुपयांचे लक्ष दिले आहे. मॉर्गन स्टेनलेने शेअरमध्ये ओवररेटेड रेटिंग दिले आहे. त्यासाटी 832 रुपयांचे लक्ष दिले आहे. जून तिमाहीमध्ये कंपनीला 740 कोटींचा नफा मिळाला होता. जून तिमाहीमध्ये UPL चा महसूल 8.7 टक्कांनी वाढला आहे.

Marico
एमएमसीजी दिग्गज Marico वर ब्रोकरेज हाउस UBSने खरेदीचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 600 रुपयांचे लक्ष ठेवले आहे. Citi नेसुद्धा या शेअरमध्ये खरेदीचा सल्ला दिला  आहे. त्यासाठी 595 रुपयांचे लक्ष ठेवले आहे.

IDFC First Bank
IDFC First Bank मध्ये दिग्गज ब्रोकरेज हाऊस मॉर्गन स्टेनलेने ओवररेटिंगचा सल्ला दिला आहे. या शेअरसाठी 35 रुपयांचे लक्ष ठेवण्यात आले आहे.