मागच्या २४ तासात या राज्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही

मागच्या २४ तासात ९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण सापडलेला नाही.

Updated: May 13, 2020, 09:34 PM IST
मागच्या २४ तासात या राज्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही title=

नवी दिल्ली : मागच्या २४ तासात ९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण सापडलेला नाही. एका दिवसात छत्तीसगड, लडाख, मणीपूर, मेघालय, दीव दमण, सिक्कीम, नागालँड आणि लक्षद्वीपमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी दिली आहे. 

देशभरात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ७४,२८१ एवढी झाली आहे. मागच्या १४ दिवसांमध्ये रुग्णसंख्या दुप्पट व्हायचा वेग ११ दिवस होता, तो आता मागच्या तीन दिवात १२.६ एवढा झाला आहे. म्हणजे आता १२.६ दिवसात कोरोनाग्रस्तांची संख्या दुप्पट होते आहे. 

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २,४१५ एवढी झाली आहे. बुधवारी सकाळी ८ वाजताच्या आकडेवारीनुसार मागच्या २४ तासात कोरोनामुळे १२२ जणांचा मृत्यू झाला, तर ३,५२५ नवे रुग्ण समोर आले. कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्यांची टक्केवारी रुग्णांच्या ३.२ टक्के एवढी आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ३२.८ टक्के एवढी आहे. 

दुसरीकडे देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यातली कोरोनाग्रस्तांची संख्या २५,९१२ वर पोहोचली आहे, तर आत्तापर्यंत ९७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे ८०० रुग्ण वाढले असून दिवसभरात ४० जणांना जीव गमवावा लागला आहे. महाराष्ट्रात एका दिवसामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या १,४९५नी वाढली आहे, तर ५४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ, ५४ जणांचा मृत्यू