पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर WhtasApp ग्रुपवर टाकला फोटो, म्हणाला 'मी दोघांनाही...', नातेवाईक हादरले

अरुणाचल प्रदेशातील लोगडिंग जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नी आणि मुलाची अत्यंत निर्दयीपणे हत्या केली. यानंतर त्याने व्हॉट्सअप ग्रुपवर दोघांचा फोटो शेअर केला आणि आपण हत्या केल्याचं सांगितलं. यानंतर एकच खळबळ माजली होती.   

शिवराज यादव | Updated: Aug 25, 2024, 02:08 PM IST
पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर WhtasApp ग्रुपवर टाकला फोटो, म्हणाला 'मी दोघांनाही...', नातेवाईक हादरले title=

अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) लोगडिंग जिल्ह्यात एका व्यक्तीने पत्नी आणि मुलाची अत्यंत निर्दयीपणे हत्या केली. यानंतर त्याने व्हॉट्सअप ग्रुपवर दोघांचा फोटो शेअर केला आणि आपण हत्या केल्याचं सांगितलं. यानंतर एकच खळबळ माजली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ  गाठलं. पोलीस सध्या हत्येच्या कारणांचा शोध घेत आहे. 

पोलीस अधीक्षक डेकियो गुमजा यांनी सांगितलं आहे, पोलिसांनी खानू गावात वास्तव्यास असणाऱ्या 35 वर्षीय गंगनगाम गंगसा याला अटक केली आहे. आरोप आहे की, गंगनगामने शनिवारी आपली पत्नी नगमजुन गंगसा आणि मुलगा फागांग गंगसा यांची हत्या केली. 

पोलीस अधिक्षकांनी सांगितल्यानुसार, मंगू पांसा नावाच्या एका व्यक्तीने लोंगडिंग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी तक्रार दाखल करताना सांगितलं की, गंगनगाम गंगसाने आपली पत्नी आणि मुलाचा एक फोटो व्हॉट्सअपवर शेअर केला होता. यावेळी त्याने आपण त्यांची हत्या केल्याचं सांगितलं. 

पुढे त्यांनी सांगितलं की, घटनेची माहिती मिळताच तक्रारदार आणि कार्यकारी दंडाधिकारी बिनी शिवा यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महिला आणि मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. यानंतर ते नातेवाईकांकडे सोपवण्यात आले. 

पोलिसांनी याप्रकरणी आरोपी गंगनगाम गंगसाला अटक केली आहे. तसंच घटनास्थळावरुन कुदळ जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पण या हत्येमागे नेमकं काय कारण होतं याचा तपास केला जात आहे.