लग्न म्हणजे काय? विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक कोमात, म्हणाले 'तू जरा..'

सोशल मीडियावर एका विद्यार्थ्याने लग्नावर लिहिलेला निबंध व्हायरल होत आहे. त्याने लिहिलेला निबंध वाचून शिक्षकांनाही धक्का बसला.   

शिवराज यादव | Updated: Oct 31, 2023, 05:09 PM IST
लग्न म्हणजे काय? विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक कोमात, म्हणाले 'तू जरा..' title=

शाळा म्हटलं की अनेक आठवणी जाग्या होतात. शालेय जीवनातील मित्रांपासून ते बाकावर त्यांच्यासह केलेी मस्ती या सुवर्ण आठवणी कायमच्या मनावर कोरलेल्या असतात. याच काळात काही विद्यार्थ्यांचे पराक्रम हे आयुष्यभर लक्षात राहणारे असतात. पूर्वीच्या काळात सोशल मीडिया नसल्याने अनेक गोष्टी शाळेपुरत्या मर्यादित राहत असतात. पण आता मात्र सोशळ मीडियामुळे या गोष्टी जगासमोर येतात. विद्यार्थ्यांचे हे पराक्रम पाहिल्यानंतर नेमकं हसावं की रडावं हा प्रश्न पडतो. अशाच एका विद्यार्थ्याने लग्नावर लिहिलेला निबंध सध्या व्हायरल झाला आहे. 

लग्न म्हणजे काय? या विषयावर शिक्षकाने विद्यार्थ्यांना निबंध लिहिण्यास सांगितलं होतं. त्यावर एका विद्यार्थ्याने असा काही निबंध लिहिला आहे की, तो वाचल्यानंतर शिक्षकांनाही धक्का बसला आहे. निबंध वाचून शिक्षकाने 10 पैकी 0 गुण देत, लाल रंगाच्या पेनाने शेराही लिहिला आहे. तसंच त्याच्यावर मूर्खपणा लिहित आपल्याला येऊन भेटण्यास सांगितलं आहे. 

"लग्न तेव्हा होते जेव्हा मुलीच्या घरचे तिला सांगतात की तू आता 'मोठी' झाली आहेस, आता आम्ही तुला पोसू शकत नाही. तुझं पोट भरणारा मुलगा सापडला तर बरे होईल. आणि मग ती मुलगी एका माणसाला भेटते, ज्याचे आईवडील त्याला लग्नासाठी ओरडत असतात आणि म्हणत असतात की आता तू  मोठा झाला आहेस. दोघेही स्वतःची परीक्षा घेतात आणि आनंदी होतात. मग ते एकत्र राहण्यास तयार होतात. आणि हा मूर्खपणा कायम ठेवण्यासाठी मुलं जन्माला घालतात," असं या विद्यार्थ्याने आपल्या निबंधात लिहिलं होतं. 

एक्सवर एका युजरने विद्यार्थ्याने लिहिलेल्या निबंधाचा फोटो शेअर केला आहे. ही पोस्ट अनेकांनी शेअर केले असून, त्यावर कमेंटही केल्या आहेत. काही युजर्सनी आम्ही 10 पैकी 10 मार्क दिले असते असं म्हटलं आहे. तर एका यूजरने , या मुलाला कोणीतरी पुरस्कार द्यावा, असेही म्हटले.

पण आता हा निबंध खरंच विद्यार्थ्याने लिहिला आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या हेतून केलेली खोड आहे याबाबत शंका आहे. याचं कारण कोणतीही शाळा शाळकरी मुलांना लग्न म्हणजे काय? या विषयावर निबंध लिहायला सांगणार नाही. त्यामुळे या निबंधावर शंका उपस्थित होत असेल तर त्यात काही वावगं नाही.