वहिनीच्या प्रेमात वेडा, सख्या भावाचा अडथळा लहान भावाने असा केला दूर

Crime News In Marathi: वहिनीच्या प्रेमात पडलेल्या लहान भावाने त्याच्या मोठ्या भावालाच ठार केले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Mar 12, 2024, 02:34 PM IST
वहिनीच्या प्रेमात वेडा, सख्या भावाचा अडथळा लहान भावाने असा केला दूर title=
A young man in love with his sister in law killed his elder brother

Crime News In Marathi: अलीकडच्या काळात नातेसंबंधाची व्याख्याच बदलत चालली आहे. छत्तीसगढमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कवर्धा जिल्ह्यात एका तरुणाने त्याच्या सख्ख्या भावाची निर्घृणपणे हत्या केली आहे. भावाच्या मृत्यूनंतर घरातील सगळ्यांना त्याचा आकस्कात मृत्यू झाल्याचे सांगून त्याच्यावर अत्यंसंस्कार करण्याची तयारी करत होता. मात्र, एका चुकीमुळं त्याचा पर्दाफाश झाला. (Crime News)

जिल्ह्यातील बांगर गावात राहणारा बिरसु राम त्याच्या पत्नी व मुलांसह राहत होता. मात्र, त्याचा लहान भाऊ भीम सैयाम याची त्याच्या वहिनीवर घाणेरडी नजर पडली. त्याच्या मोठ्या भावाला याची माहिती मिळताच तो चिडला. बिरसू या गोष्टीमुळं खूप चिंतीत होता तसंच, यामुळं तो सतत दारू देखील प्यायला लागला होता. 

मागील शुक्रवारी बिरसू खूप दारु पिऊन आला होता. याचाच फायदा घेऊन त्याचा छोटा भाऊ भीम सौयानने त्याच्या मोठ्या भावाची तेलाने मालिश करतो असं सांगून गळा दाबून हत्या केली. त्यानंतर घरातील काही सदस्यांना विश्वासात घेऊन मोठ्या भावाचा अचानक मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी भावाचा मृतदेह घेऊन अत्यंसंस्कार करण्यासाठी घेऊन गेला. 

गावकऱ्यांना जेव्हा बिरसूच्या मृत्यूची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी आरोपीला कारण विचारले. मात्र, घाबरलेल्या लहान भावाने त्याच्या मृत्यूचे कारण वेगवेगळे दिले. त्यामुळं गावकऱ्यांचा लहान भाऊ भीम सैयामवर संशय गेला. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांच्या भीतीने आरोपी त्याच्या मोठ्या भावाचा मृतदेह घेऊन घरी परतला. 

पोलिसही घटनास्थळी पोहोचले आणि त्याची सर्व चौकशी केली. पोलिसांनाही त्याने अशीच उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी सखोल चौकशी करत अखेर त्याच्याकडून सत्य वदवूनच घेतलं. आरोपी भीम सैयाम यानेच त्याच्या मोठ्या भावाची हत्या केल्याचं समोर आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याला लगेचच अटक केले. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भीम सैयान हा सख्या वहिनीच्या प्रेमात वेडा झाला होता. त्यातूनच त्याने 8 मार्च रोजी मोठ्या भावाची हत्या केली. कवर्धा पोलिसांनी आरोपी भीम सैयामला कलम 302 अंतर्गंत अटक करुन तुरुंगात टाकले.