साखरपुड्यानंतर भावी नवऱ्यासह संमतीने लैंगिक संबंध, रक्तस्त्रावामुळे तरुणीचा मृत्यू

लवकरच दोघे विवाहबंधनात अडकणार होते.  

Updated: Sep 8, 2021, 06:27 PM IST
साखरपुड्यानंतर भावी नवऱ्यासह संमतीने लैंगिक संबंध, रक्तस्त्रावामुळे तरुणीचा मृत्यू

भोपाळ : साखरपुड्यानंतर खऱ्या अर्थाने भावी पती-पत्नी एकमेकांच्या जवळ येतात. साखरपुड्यानंतर भावी पती-पत्नी अनेकदा भेटतात. एकमेकाचा स्वभाव जाणून घेण्यासाठी एकत्र फिरतातही. दोघांना एकमेकांची कंपनी हवीहवीशी वाटते. अशाच एका जोडप्याचा साखरपुडा झाला होता. साखरपुडा झालेल्या या जोडप्यानी संमतीने सेक्स करण्याचं ठरवलं. सेक्स करण्यासाठी दोघेही हॉटेलवर गेले. मात्र सेक्सदरम्यान तरुणीचा रक्तस्त्रावामुळे मृत्यू झाला. (after engagement girl had a physical relationship with the fiance lost her life due to excessive bleeding)

सदर घटना ही मध्यप्रदेशातील भोपाळमधील कोलारमध्ये 5 सप्टेंबरला घडली.  साखरपुड्यानंतर तरुणी आपल्या भावी पतीला भेटण्यासाठी भोपळला पोहचली. या दरम्यान दोघांनी सहमतीने सेक्स करण्याचं ठरवलं. त्यानुसार संध्याकाळी सेक्स करण्याचं ठरवलं. 

सेक्स करताना तरुणीला रक्तस्त्राव झाला. या दरम्यान तिची प्रकृती खालावली. त्यामुळे तरुण आपल्या होणाऱ्या पत्नीला उपचारांसाठी रुग्णालयात घेऊन गेला. मात्र या रुग्णालयात काही होऊ न शकल्याने तरुणाने भावी पत्नीला दुसऱ्या रुग्णालयात हलवलं. या दरम्यान रक्तस्त्राव हा सुरुच होता. अखेर रक्तस्त्राव न थांबल्याने तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला. तरुणीने मृत्यू आधी स्वत:बद्दल माहिती दिली. मात्र भावी पतीबाबत काहीचं सांगितलं नाही.   

हा तरुण एका हॉटेलमध्ये काम करतो. त्याचा साखरपुडा मंडीदीपमध्ये राहणाऱ्या एका तरुणीसोबत झाला. लवकरच दोघे विवाहबंधनात अडकणार होते. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाला. या साऱ्या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. हा नैसर्गिक मृत्यू आहे की घातपात याबाबत पोलिसांकडेही काही पुरावा नाही. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला. दरम्यान पोस्ट मार्टमच्या रिपोर्टनंतर मृत्यूचं कारण स्पष्ट होईल.