नववधु कोरोना पॉझिटिव्ह, नवऱ्यामुलासाह ३३ जण क्वारंटाईन

लग्नसोहळ्यासाठी केवळ 50 लोकांची परवानगी देण्यात आली आहे.

Updated: May 22, 2020, 03:56 PM IST
नववधु कोरोना पॉझिटिव्ह, नवऱ्यामुलासाह ३३ जण क्वारंटाईन  title=
संग्रहित फोटो

भोपाळ : मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक नववधू लग्नानंतर तीन दिवसांतच कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. नववधूला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता नवऱ्यामुलासह 33 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. नववधूला उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे. हा लग्नसोहळा 18 मे रोजी पार पडला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीची तब्येत गेल्या काही दिवसांपासून खराब होती. 7 दिवसांपर्यंत ताप जात नसल्याने मुलीने कोरोना चाचणी केली होती. त्याचदरम्यान तीच लग्न झालं.

लग्नानंतर बुधवारी तिचा कोरोनाचा रिपोर्ट आला. मुलीच्या कुटुंबियांनी मुलीला फोन करुन तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. त्यानंतर भोपाळमधील एम्स रुग्णालयात मुलीला दाखल करण्यात आहे. नवऱ्यामुलासह 33 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

EXCLUSIVE : अभिनेता अक्षय वाघमारेचं 'डॅडी'च्या मुलीशी लॉकडाऊन लग्न

दरम्यान, गृहमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, लग्नसोहळ्यासाठी केवळ 50 लोकांची परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनामुळे इमारतीच्या खिडकीत उभे राहून लग्न, शेजारच्यांनी खिडकीतूनच दिल्या शुभेच्छा

 

पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय