HDFC, ICICI, Axis, SBI च्या खातेदारांनो सावध व्हा!!! सायबर अटॅकचा धोका

जर तुमचं बँक खातं HDFC, ICICI, SBI, PNB, AXIS बँकेमध्ये असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कारण काही सायबर अटॅकर्स या बँकेतील खातेदारांना आमिष दाखवून त्यांची गोपनिय माहिती चोरण्याच्या प्रयत्नात आहेत. 

Updated: Mar 19, 2021, 01:25 PM IST
HDFC, ICICI, Axis, SBI च्या खातेदारांनो सावध व्हा!!! सायबर अटॅकचा धोका

मुंबई : जर तुमचं बँक खातं HDFC, ICICI, SBI, PNB, AXIS बँकेमध्ये असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्वाची आहे. कारण काही सायबर अटॅकर्स या बँकेतील खातेदारांना आमिष दाखवून त्यांची गोपनिय माहिती चोरण्याच्या प्रयत्नात आहेत. 
नवी दिल्लीत असलेल्या सायबर सिक्युरिटी कंपनी ऑटोबोट इंफोसेकने सायबरपीस फाऊंडेशनसोबत केलेल्या एका तपासात ही माहिती समोर आलेली आहे. 

या सायबर गुन्हेगारांकडून खातेदारांना एक मेसेज पाठवला जातो, ज्यामध्ये एक लिंकही देण्यात आलेली आहे. या मेसेजमध्ये लोकांना सांगण्यात येत आहे की, जर तुम्हाला आयकराचा परतावा (Income Tax Return) हवा असेल, तर एक अर्ज पाठवा. त्या लिंकवर क्लिक केल्यावर एक फॉर्म उघडतो, जो अगदी इन्कम टॅक्सच्या वेबसाईटसारखाच दिसतो. 

मिळालेल्या माहितीनुसार ही लिंक अमेरिका आणि फ्रान्समधून हाताळण्यात येते. या सगळ्यात http चा वापर केला जात आहे, जेव्हा की https हे सगळ्यात सुरक्षित मानलं जातं. 

काही जणांना हे खोटे फॉर्म खरोखर वाटून त्यात ते सगळी माहिती भरतात. ज्यामुळे खातेदारांची गोपनिय माहिती जसं की आधार-पॅन नंबर, बँक खात्याचा नंबर, IFS कोड सायबर हॅकर्सच्या हाती लागते. 

यानंतर आता सरकारी यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. वाढते सायबर हल्ले (cyber attack) पाहता सरकार डिजिटल इंटिलिजन्स यूनिट आणण्याच्या तयारीत आहे. IT Ministry यावर काम करत आहे. DIU पोलिस, सायबर सेल आणि बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन यावर काम करणार आहे. 

ऑनलाईन फसवणुकीपासून कसं सावध राहायचं?

1. कुणाहीसोबत OTP शेअर करू नका
२. जर तुम्हाला कुठला SMS आला असेल, ज्यामध्ये लिंक पाठवण्यात आली असेल, तर अशी लिंक चुकूनही उघडू नका. 
३. कोणत्याही अनोळखी वेबसाईट किंवा अॅपवरून खरेदी करू नका. अशा वेबसाईटवर सामान अगदी स्वस्तात दाखवून तुमची फसवणूक केली जाते. 
४. क्रेडिट-डेबिट कार्ड, बँक खातं किंवा इतर कोणतेही पासवर्ड कुणाहीसोबत शेअर करू नका