महागाईने सर्वसामान्यांना पुन्हा एकदा जोरदार धक्का दिलाय. ऐन सणासुदीच्या (Diwali) काळातच दुधाचे दर वाढले आहेत. अमूलने (Amul) आपल्या ग्राहकांना मोठा धक्का देत दुधाच्या (Milk) दरात दरवाढ केली आहे. कंपनीने आपल्या दुधाच्या किमतीत (Amul price hike) 2 रुपयांनी वाढ केली आहे. अमूलने फुल क्रीम दुधाची किंमत 61 रुपयांवरून 63 रुपये प्रति लिटर केली आहे. मात्र, दुधाच्या दरवाढीबाबत कंपनीकडून अद्याप कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही. अमूलनंतर आता इतर कंपन्याही या सणासुदीच्या काळात दुधाच्या दरात वाढ करू शकतात. (Amul Milk Price Hike before Diwali)
देशातील प्रसिद्ध दूध ब्रँड असलेल्या अमूल आणि मदर डेअरी या दोन्ही कंपन्यांनी खरेदी खर्चात झालेल्या वाढीची भरपाई करण्यासाठी ऑगस्टमध्ये दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली होती. त्याच्याही आधी मार्च महिन्यात दरवाढ करण्यात आली होती. त्यामुळे आता दुधाचे दर वाढल्याने लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम होणार आहे.
दुधाचे भाव का वाढत आहेत?
दरवाढीबाबत अमूलने अद्याप कोणतेही कारण दिलेले नाही. मात्र सुरुवातीला जाहीर झालेल्या घाऊक महागाईच्या आकडेवारीवरून असे मानले जात होते की चाऱ्याचे दर 25 टक्क्यांच्या विक्रमी वाढीच्या जवळ आहेत. अशा स्थितीत शेतकर्यांना त्यांची जनावरे पाळण्यात अडचणी येत असून पूर्वीपेक्षा जास्त पैसे गुरांवर खर्च होत आहे. त्यामुळे दूध उत्पादनाचा खर्च सातत्याने वाढत आहे.
महागाईचा दर रिझव्र्ह बँकेने ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा सातत्याने जास्त राहिला आहे. सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर 7.41 टक्के होता. ऑगस्टमध्ये ते 7 टक्के होता. केवळ खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर बघितला तर परिस्थिती आणखी वाईट आहे. सप्टेंबर 2022 मध्ये, अन्न किंमत निर्देशांक म्हणजेच अन्न महागाई दर 8.60 टक्के होता. त्याच वेळी, ऑगस्ट 2022 मध्ये ते 7.62 टक्के आणि गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 0.68 टक्के होते.