Viral : इवल्याशा चिमणीने स्पष्ट आणि नाजूक शब्दात म्हटलं, I Love You ऐकणारा म्हणतोय ''हो'' खरंच

पांढऱ्या रंगाची ही चिमणी व्हिडिओमध्ये मनसोक्त वावरताना दिसत आहे. 

Updated: Jun 14, 2021, 05:16 PM IST
Viral : इवल्याशा चिमणीने स्पष्ट आणि नाजूक शब्दात म्हटलं,  I Love You ऐकणारा म्हणतोय  ''हो'' खरंच

मुंबई : सोशल मीडियाच्या विश्वात रोज एकतरी असा व्हिडिओ व्हायरल होतो, ज्याला पाहून थकवा, तणाव क्षणात नाहीसा होतो. सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो एका छोट्या आणि गोंडस चिमणीचा आहे. पांढऱ्या रंगाची ही चिमणी व्हिडिओमध्ये मनसोक्त वावरताना दिसत आहे. एवढंच नाही तर ही चिमणी तिच्या गोड आवाजात तिच्या मनातल्या भावना सांगत आहे. एखाद्या प्रति प्रेम व्यक्त करणं ही भावना अतिशय समाधान देणारी असते. 

इवल्याशा चिमणीने स्पष्ट आणि नाजूक शब्दात I Love You म्हटलं आहे. तिचे स्वर ऐकल्यावर तुम्हालाही फार छान वाटेल. व्हिडिओ पाहाताचं तुमच्या तोंडून देखील 'Wow' हा शब्द निघेलचं. पाहा व्हिडिओ....

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instagram (@instagram)

व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या पक्ष्याचं नाव Arlo असं आहे. या पक्ष्याला पॅसेफिक पॅरटलेट किंवा प्रशांत असं देखील म्हणतात. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओतल्या चिमणीवर कमेन्ट आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.