अरुण जेटलींकडे आजपासून पुन्हा अर्थ खात्याची जबाबदारी

3 महिन्यानंतर अरुण जेटलींनी पुन्हा स्विकारली जबाबदारी

Updated: Aug 23, 2018, 10:29 AM IST
अरुण जेटलींकडे आजपासून पुन्हा अर्थ खात्याची जबाबदारी title=

नवी दिल्ली : तीन महिन्यानंतर अरुण जेटली पुन्हा एकदा अर्थ खात्याचे कार्यभार सांभाळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जेटलींना पुन्हा एकदा अर्थ खात्याची जबाबदारी दिली आहे. अरुण जेटली यांचं किडनी प्रत्यारोपण झालं आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे 14 मेपासून त्यांच्या विभागाची जबाबदारी पीयूष गोयल यांच्याकडे सोपवण्यात आली होती. गोयल यांच्याकडे रेल्वे आणि कोळसा मंत्रालय देखील आहे.

मागील 3 महिने त्यांच्या अनुपस्थिती भाजप सरकारला भासत होती. राज्यसभेत उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी अरुण जेटली राज्यसभेत उपस्थित होते. अर्थमंत्री अरुण जेटली यांना किडनीचा त्रास होता. दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था ( एम्स ) मध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. आजपासून पुन्हा एकदा ते आपली जबाबदारी स्विकारत आहेत.