PM Modi mangalsutra controversy : मोदीजी मंगळसूत्राचं महत्त्व तुम्हाला कधीपासून कळायला लागलं? असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे. देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता आल्यास वाट्याची संपत्ती, हिंदू महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र हे जास्त मुलं असणा-यांना दिली जातील असा आरोप मोदींनी केला होता. त्यावरच ठाकरेंनी पलटवार केला आहे. तसंच महाराष्ट्रातली जनता तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही ठाकरेंनी मोदींना दिला.
राजस्थान बांसवाडातल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे वक्तव्य केलं आणि नव्या वादाला तोंड फुटलंय... मंगळसूत्र... महिलांचं सौभाग्याचं लेणं... मंगळसूत्र... महिलांचा प्राणप्रिय दागिना... मात्र याच मंगळसूत्रावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्यात. काँग्रेसची सत्ता आल्यास माता-भगिनींचं सोन्याचं मंगळसूत्र हिसकावून घेतलं जाईल, असा इशारावजा गंभीर आरोप मोदींनी केला. काँग्रेसनं मात्र हे आरोप धुडकावून लावले. पक्षाच्या जाहीरनाम्यात असा काहीच उल्लेख नसल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलंय... तर माझ्या आईचं मंगळसूत्र या देशासाठी कुर्बान झालं, असं भावनिक प्रत्युत्तर प्रियंका गांधींनी बंगळुरूच्या सभेत केले.
मंगळसूत्रावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडू लागल्यात. त्यात आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भर पडलीय. मंगळसूत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडं तक्रार केलीय... निवडणूक आयोगानं अजून तरी त्याबाबत काहीच पाऊल उचललेलं नाही. मात्र मुस्लीम, मच्छी, मेनिफेस्टो या निवडणूक प्रचारातल्या एम फॅक्टरमध्ये आता महिला आणि मंगळसुत्राची नवी भर पडली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 एप्रिलला पुणे दौ-यावर येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून शहरात तयारीला सुरुवात झालीये. मोदी ज्या मार्गावरून जाणार त्या मार्गाची पुणे पोलीस आयुक्तांसह पोलीस दलातील आधिका-यांकडून मुख्य मार्गांची पाहणी करण्यात आली आहे..