स्क्रॅप माफिया ते करोडपती, आता साम्राज्य संकटात... कोण आहे गँगस्टर रवी काना?

भंगार खरेदी आणि विक्री करुन मालामाल झालेला रवी काना आणि त्यांची गर्लफ्रेंडला पोलिसांनी जेरबंद केलंय. या दोघांना थायलंडमधून पकडण्यात आलं असून 200 कोटींपेक्षा अधिक मालमत्ता जप्त केल्यामुळे त्यांचं साम्राज्य संकटात आलंय.     

नेहा चौधरी | Updated: Apr 24, 2024, 10:30 PM IST
स्क्रॅप माफिया ते करोडपती, आता साम्राज्य संकटात... कोण आहे गँगस्टर रवी काना? title=
scrap mafia to millionaires now an empire in crisis Who is gangster Ravi Kana

स्क्रॅप माफिया रवी कानाला पकडण्यात भारतीय पोलिसांनी यश मिळालंय. पश्चिम उत्तर प्रदेशातील फरारी गुंड रवी नागर उर्फ ​​रवी काना आणि त्याची गर्लफ्रेंड काजल झाला थायलंडमधून अटक करण्यात आलीय. रवीची 200 कोटींची मालमत्ता पोलिसांनी जप्त केलीय. दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीतील गर्लफ्रेंडच्या नावावर असलेला बंगला ज्याची किंमत 80 कोटी आहे पोलिसांनी त्याला सील केलंय. काजल झा ही रवीची फक्त गर्लफ्रेंड नव्हती तर त्याची क्राईम पार्टनरदेखील होती. ती स्क्रॅप कंपनीची संचालक होती. 

असा बनला हा गँगस्टर..!

एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, रवी नगर उर्फ ​​रवी काना हा एक भंगार विक्रेता होता. या वर्षाच्या सुरुवातील 2 जानेवारीला ग्रेटर नोएडामधील बीटा 2 पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गँगस्टर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार रवीविरोधात 28 डिसेंबर 2023 ला नोएडा सेक्टर 39 पोलीस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.

लुकआउट सर्क्युलर आणि रेड कॉर्नर नोटीस जारी

एवढंच नाही तर एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गौतम बुद्ध नगर पोलीस परदेशातील इंटरपोल आणि स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून तो देश सोडून पळून गेल्याच्या संशयावरून त्याचा शोध सुरु झाला. त्यानंतर या वर्षी जानेवारी महिन्यात रविविरोधात लुकआउट आणि रेड कॉर्नर नोटीसही जारी केली. त्यानंतर रवी काना आणि काजल झा थायलंडमध्ये असल्याचा कळलं. दिल्ली पोलिसांनी थायलंड पोलिसांच्या मदतीने रवी आणि काजलला गजाआड केलं. 

रवी कानाचं साम्राज्य धोक्यात!

गँगस्टर ॲक्टचा गुन्हा दाखल झाल्यानंतर नोएडा पोलिसांनी रवी कानाच्या टोळीतील सुमारे डझनभर सदस्यांना एकापाठोपाठ अटक केली. त्यासोबत त्याचे कारखाने, कार्यालये आणि वाहनांसह सुमारे 200 कोटींची मालमत्ता पोलिसांनी जप्त केलीय. यामध्ये पोलिसांनी इकोटेक 1 परिसरात 5 कोटी रुपयांचे भंगार आणि 30 कोटी रुपयांची जमीन जप्त केली. शिवाय बिसराखच्या चेरी काउंटी परिसरात 5000 यार्ड जमीनसह 20 रिकामं ट्रक आणि भंगाराने भरलेल्या दोन ट्रकवरही कारवाई केली. ज्यांची किंमत सुमारे 5 कोटींपर्यंत आहे. तर 10 लाख रुपये किमतीचे 200 टन भंगार आणि रॉडही पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहेत. त्याशिवाय 60 मोठी वाहनेही सील केलीय.

दरम्यान पोलिसांच्या चौकशीदरम्यान अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. रवी कानाचे व्हाइट कॉलर लोकांशी संबंध असल्याची संशय पोलिसांना आहे. तर रवीने आपल्या मेहुण्या बेबन नगरलाही निवडणुकीत उतरवलंय. 

 अशी झाली काजलशी ओळख

साधारण 8 वर्षांपूर्वी दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीत राहणारी एक तरुणी रवी कानाकडे नोकरीसाठी आली होती. त्याने तिला आपल्या टोळीत शामील करुन घेतलं. या गुन्हेगारी जगात तिची आणि त्याची ही पहिलीच ओळख आणि हळूहळू ही तरुणी रवीची सर्वात विश्वासातील झाली. रवी या तरुणीच्या प्रेमात पडला. ही होती काजल झा. अशाप्रकारे या दोघांची प्रेम कहाणी सुरु झाली आणि आज हे दोघे पोलिसांच्या अटकेत आहेत.