नवी दिल्ली : अयोध्या राममंदिर प्रकरणी आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. त्यानुसार आज सुप्रीम कोर्टाने अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा पहिला आदेश दिला आहे.
सुप्रीम कोर्टाने मुख्य याचिका वगळता सर्व खटले रद्द केले. केवळ मुख्य पक्षकाराचीच बाजू खटल्यात ग्राह्य धरली जाणार आहे. इतर याचिकामुळे अनावश्यक हस्तक्षेप होत आहे, असेसर्वोच्च न्यायालयाचे निरिक्षण नोंदवले आहे.
#Ayodhya matter:The Supreme Court has dismissed all the intervention applications filed in the case
— ANI (@ANI) March 14, 2018
रामजन्मभूमी प्रकरण लवकर निकाली काढण्यासाठी हस्तक्षेप केलेल्या याचिका बाजूला केल्या. अनेक संस्था आणि व्यक्तींनी अयोध्या प्रकरणी याचिका दाखल केल्या होत्या.
सलमान खुर्शीद, सुब्रमण्यम स्वामी यांच्यासह विविध संस्थांना या खटल्यातून बाजूला केले आहे.