Video: या मंदिरात दगडफेक करून साजरी केली जाते राखी पौर्णिमा

उत्तराखंडच्या चंपावत जिल्ह्यामध्ये प्रत्येक वर्षी राखी पौर्णिमेला बग्वाल खेळलं जातं.

Updated: Aug 26, 2018, 10:10 PM IST
Video: या मंदिरात दगडफेक करून साजरी केली जाते राखी पौर्णिमा title=

डेहराडून : उत्तराखंडच्या चंपावत जिल्ह्यामध्ये प्रत्येक वर्षी राखी पौर्णिमेला बग्वाल खेळलं जातं. या खेळामध्ये लोकं वेगवेगळ्या गटामध्ये वाटले जातात आणि एकमेकांवर दगडफेक करतात. दगडफेक केल्यानंतर वेगवेगळ्या गटातील लोकं एकमेकांची गळाभेटही घेतात. या वर्षी या खेळामध्ये ६० पेक्षा जास्त लोकं जखमी झाली आहेत. जखमीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

देवीधुरामध्ये वाराही देवी मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रत्येक वर्षी राखी पौर्णिमेला बग्वाल खेळलं जातं. या खेळामध्ये एकमेकांना निशाणा बनवून दगडफेक केली जात नाही. एक गटातून दुसऱ्या गटामध्ये दगड पोहोचवणं या खेळाचा उद्देश असतो. प्रत्येक वर्षी या खेळामध्ये अनेक जण जखमी होतात.

यावर्षी बग्वाल खेळताना फळं-फुलं आणि दगडांचा वापर करण्यात आला. जवळपास ८ मिनिटं बग्वालचा खेळ खेळण्यात आला. यामध्ये ५ डझन बग्वाली आणि प्रेक्षक जखमी झाले. बग्वाल बघण्यासाठी २० हजारांपेक्षा जास्त प्रेक्षक आले होते.