जयपूर : राजस्थानमधील बान्सवाडाचे भाजपचे आमदार यांच्या मुलाची गुंडागर्दी दिसून आली. आमदाराच्या मुलाच्या गाडीला एका कार चालकाने बाजू दिली नाही म्हणून भर रस्त्यात गाडी थांबवून कार चालकाला गाडीतून ओढून जोरदार मारहाण केली. त्यावेळी मुलाचे समर्थकांनीही मारहाण केली. तसेच गाडीवर दगडफेक केली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भाजप आमदार धनसिंग रावत यांचा मुलगा राजा आपल्या मित्रांसोबत कारमधून जात होते. त्यावेळी दुसऱ्या कार चालकाने पुढे जाण्यासाठी बाजू दिली नाही. यावरुन आमदारांचे चिरंजीव भडकले आणि गाडी कारच्या पुढे नेत थांबविली. गाडीतून उतरुन कार चालकाला ओढून बाहेर काढले आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.
#WATCH: Banswara BJP MLA Dhan Singh Rawat's son Raja, thrash a man after he (man) allegedly did not let his (Raja's) vehicle pass in Banswara's Vidyut Colony. He overtakes the man's car, blocks the way & thrashes him. (CCTV Footage of June 1, 2018) #Rajasthan pic.twitter.com/s6p39KvFEg
— ANI (@ANI) June 30, 2018
आमदाराच्या मुलाच्या समर्थकांनीही कार चालकाला मारहाण केली. त्यानंतर त्याच्या गाडीची तोडफोडही केली. मात्र, कायदा हातात घेऊनही आमदाराच्या मुलावर पोलिसांनी कारवाई केली की नाही, याची माहिती उपलब्ध झाली नाही. मात्र, मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.