Best Pick | चांगल्या कमाईसाठी या सिमेंट स्टॉकमध्ये गुंतवा पैसा; एक्सपर्ट चॉईस

 भारतीय शेअर बाजारात सध्या तेजीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे काही शेअर्सचा परफॉर्मन्स चांगला राहिला आहे.

Updated: Sep 6, 2021, 12:39 PM IST
Best Pick | चांगल्या कमाईसाठी या सिमेंट स्टॉकमध्ये गुंतवा पैसा; एक्सपर्ट चॉईस

 मुंबई : भारतीय शेअर बाजारात सध्या तेजीचे वारे वाहत आहेत. त्यामुळे काही शेअर्सचा परफॉर्मन्स चांगला राहिला आहे. आम्ही तुमच्या पोर्टफोलियोला मजबूत बनवण्यासाठी भन्नाट शेअर घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुम्हाला येत्या काळात चांगला रिटर्न मिळू शकतो. विशेष म्हणजे हा शेअरची निवड स्वतः मार्केट एक्सपर्ट संदिप जैन यांनी केली आहे.

मार्केट एक्सपर्ट संदिप जैन यांनी आज  Deccan Cements या कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जैन यांच्यामते ही 1100 कोटी रुपये मार्केट कॅप असणारी कंपनी आहे. ही कंपनी 1979 पासून काम करीत आहे. कंपनीने 1982 पासून आपले प्रोडक्शन सुरू केले होते.

Buy Call
Deccan Cements
CMP 748.90
TARGET 830
 

 जैन यांनी सांगितले की,  कंपनीचे देशात अनेक प्रकारचे प्रोजेक्ट आहेत. कंपनीने पहिला मिनी हायडल पार्क प्रोजेक्ट सुरू केला होता. कंपनीचे रिटर्न ऑन इक्विटी 23 टक्क्यांच्या आसपास आहे. कंपनीमध्ये FIIs ने आपली भागिदारी वाढवली आहे.