कौतुकास्पद! 6 गावांमध्ये बत्ती गूल, वीज कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून केलं काम ! पाहा Video

दुर्ग जिल्ह्यातील आंदा गावात शिवनाथ नदीला पूर आल्यामुळे अख्ख गाव अर्ध पाण्याखाली गेलं आहे.

Updated: Aug 13, 2022, 04:46 PM IST
कौतुकास्पद! 6 गावांमध्ये बत्ती गूल, वीज कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून केलं काम ! पाहा Video title=
bhilai viral video of electricity staff reached the submerged electric pole in the flood affected area in marathi

Video Viral  :  पावसाळ्यात वीज जाणे हे ठरलं असतं. अनेक ठिकाणी दुर्गम भागात पावसामुळे दोन दोन दिवस वीज येत नाही. वीज कर्मचाऱ्यांना अशावेळी पुरग्रस्त भागातील बिघाड दुरुस्त करणे पण कठीण असतं. पण सोशल मीडियावर एका वीज कर्मचाऱ्याचं खूप कौतुक होतं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पण त्यांचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही.

भिलाईमधील पावसाने थैमान घातलं आहे. दुर्ग जिल्ह्यातील आंदा गावात शिवनाथ नदीला पूर आल्यामुळे अख्ख गाव अर्ध पाण्याखाली गेलं आहे. मुसळधार पावसामुळे अर्धा डझन गावातीव वीजपुरवठा खंडित झाला आहे. या गावाला वीजपुरवठा करणाऱ्या खांबही अर्धा पुराच्या पाण्यात बुडाला आहे. अशा वीज पुरवठा विभागाला तक्रार करण्यात आली. पण गावात बघावं तिकडे पाणीच पाणी असल्यामुळे मदतकार्य पोहोचविण्यास अडथळे येत होती. (bhilai viral video of electricity staff reached the submerged electric pole in the flood affected area in marathi)

वीज पुरवठा विभागातून एक कर्मचारी जीवाची परवा न करता या परिसरात गेला. या कर्मचाऱ्याने जोखीम पत्करुन ट्यूबवर बसून पुराच्या पाण्यातून मार्ग काढत तो वीज खांबाजवळ पोहोचला. खांबावरील वायरची दुरुस्ती करुन त्याने गावातील खडिंत झालेला वीजपुरवठा सुरळीत केला. 

या व्हिडीओ पाहू शकता की जीव धोक्यात घालून या महावितरण कर्मचाऱ्यांने केलेल्या कामाचं सोशल मीडियावर तुफान कौतुक होतं आहे. महापुरात जीव धोक्यात घालून या कर्मचाऱ्याने आपलं कर्तव्य बजावून गावातील लोकांसाठी तो देवदूत ठरला. हा व्हिडीओ ट्विटर NaiDunia या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.