Rahul Gandhi PC LIVE : सरकारने शेअर मार्केटबाबत भ्रम पसरवले. पंतप्रधान मोदींनी जनतेला शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक करण्यास का सांगितले? ठराविक कपंन्यांना शेअर खरेदी करण्याचे आदेश का देण्यात आले? असे सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केले आहेत. 4 जूनला मार्केटवर जाईल असे सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र 3 जूनला मार्केट वर गेले आणि 4 जूनला मार्केट कोसळले. 5 कोटी जनतेची दिशाभूल झाली. शेअर मार्केटवर खोट्या एक्सिटपोलचे परिणमा पहायला मिळाले. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांचे 30 लाख कोटींचे नुकसान झाले आहे. भारतातील स्टॉक मार्केटमधील आजपर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. या घोटाळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृमंत्र्यांचा थेट सहभाग आहे. कारण, पंतप्रधान, गृहमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी लोकांना शेअर खरेदी करण्याचे अवाहन केले. त्यांना माहित होते. शेअर बाजार घोटाळा हा अदानी घोटाळ्यापेक्षा मोठा आहे. या घोटाळ्याची संसदीय समितीमार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.