दोन्ही उमेदवारांना समान मतं, 'लकी ड्रॉ'ने या पक्षाचा उमेदवार ठरला विजयी

यूपी पालिका निवडणुकीत मतमोजणी दरम्यान मथुरा प्रभाग क्रमांक 56 मध्ये भाजप आणि काँग्रेस उमेदवारामध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 1, 2017, 05:31 PM IST
दोन्ही उमेदवारांना समान मतं, 'लकी ड्रॉ'ने या पक्षाचा उमेदवार ठरला विजयी title=

लखनऊ : यूपी पालिका निवडणुकीत मतमोजणी दरम्यान मथुरा प्रभाग क्रमांक 56 मध्ये भाजप आणि काँग्रेस उमेदवारामध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळाली.

दोन्ही उमेदवारांना समान मतं

या जागेवर दोन्ही उमेदवारांना समान मतं पडली. त्यानंतर लकी ड्रॉने निकाल देण्यात आला. ज्यामध्ये भाजपच्या उमेदवार मीरा अग्रवाल या विजयी घोषित केल्या गेल्या.

लकी ड्रॉने निर्णय

दोन्ही उमेदवार मतमोजणी दरम्यान जवळपास सारख्या मतांवर होते. जेव्हा मतमोजणी पूर्ण झाली तेव्हा दोघांना समान मतं होती. दोघांनाही ८७४ मतं पडली. त्यानंतर लकी ड्रॉने निर्णय घेण्यात आला ज्यामध्ये भाजपच्या उमेदवार लकी ठरल्या.

यूपी पालिका निवडणुकीत आतापर्यंतच्या निकालानुसार भाजपने जवळपास १४ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर बीएसपी २ जागांवर आघाडीवर होती.