भाजपची लाट ओसरतेय, वर्षभरात पाच राज्यांतील सत्ता गमावली

महाराष्ट्र राज्यानंतर झारखंड हे राज्य भाजपच्या हातातून निसटले आहे.  

सुरेंद्र गांगण | Updated: Dec 23, 2019, 03:10 PM IST
भाजपची लाट ओसरतेय, वर्षभरात पाच राज्यांतील सत्ता गमावली title=

मुंबई : भाजपचा करिष्मा ओसरताना दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्यानंतर झारखंड हे राज्य भाजपच्या हातातून निसटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी झारखंडमध्ये विजयासाठी मोठी ताकद लावली होती. मात्र तिथल्या जनतेने भाजपला नाकारले आहे. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का आहे. एक वर्षात भाजपने आपल्या ताब्यातील पाच राज्य गमावलीत. त्यामुळे मोदींची लाट ओसरत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय मुद्दे प्रचारात आणण्याचा प्रयत्न भाजपला नडला आहे. झारखंडमध्ये काँग्रेस-झामुमोची पुन्हा जोरदार मुसंडी दिसून येत आहे. काँग्रेस आघाडीकडून बहुमताचा आकडा पार होताना दिसत आहे. त्यामुळे भाजपच्या सत्तेला सुरूंग लागला आहे.

राज्याच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्दे आणण्याचा भाजपचा प्रयत्न झाला. हा प्रयत्न यशस्वी होताना दिसला नाही. याचा प्रत्यय महाराष्ट्र आणि झारखंड राज्यात झालेल्या निवडणुकीच्या निकालनंतर दिसून आला. भाजपने राष्ट्रीय मुद्दे प्रचारात आणले. मात्र, महाआघाडीने स्थानिक विकासाचे मुद्दे प्रचारात ठेवले होते. त्याचा फायदा काँग्रेस-झामुमोला झाला. त्यामुळे भाजपच्या हातातून सत्ता खेचून आणण्यात काँग्रेस-झामुमो आघाडीला यश आले आहे.

झारखंडमध्ये ८१ जागांसाठी निवडणूक झाली. बहुमताचा आकडा पार केला आहे. बहुमतासाठी ४१ जागांवर विजय मिळणे गरजेचे आहे. झारखंडमध्ये काँग्रेस-झामुमोच्या आघाडीने पुन्हा एकदा मुसंडी मारली आहे. काँग्रेस-झामुमो बहुमत मिळत असल्याने झारखंडमध्ये भाजप सत्तेबाहेर जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याचे दिसत आहे. गेल्या दोन वर्षांत भाजपची चार राज्यांमधून सत्ता गेलीय. आता झारखंडमध्येल्या सत्तेलाही सुरूंग लागण्याची चिन्ह आहेत. 

झारखंडमध्ये मिळालेल्या जागा (आघाडी)

भाजप २६
काँग्रेस १४
जेएमएम २६
राजद ४
एजएसयु ३
इतर ४

भाजपच्या ताब्यातून गेलेली राज्य

- डिसेंबर २०१८ - राजस्थान
- डिसेंबर २०१८ - मध्यप्रदेश
- डिसेंबर २०१८ - छत्तीसगढ
- ऑक्टोबर २०१९ - महाराष्ट्र
- डिसेंबर २०१९ - झारखंड

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला असला तरी जागा कमालीच्या कमी झाल्या होत्या. त्यानंतर राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि आता झारखंडमधूनही सत्ता जाणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजपला उतरती कळा लागल्याचं चित्र दिसत आहे. दोन वर्षात भाजपला मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर २०१७ मध्ये ७१ टक्के देशात भाजपला यश मिळाले होते. मात्र, डिसेंबर २०१९ मध्ये भाजपकडे ३५ टक्के सत्ता आहे. गुजरात, कर्नाटक, गोवा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि ईशान्य भारतातील काही राज्ये आहेत.

झारखंड विधानसभाचे कल स्पष्ट झाला आहे. अंतिम निकाल हाती याचचा आहे. राज्यात काँग्रेस आणि मित्र पक्षानं मुसंडी मारली आहे. काँग्रेस आणि मित्र पक्षाने ३९ जागांवर आघाडी घेतली असून, भाजपला ३१ जागांवर आघाडी मिळाली आहे.