Budget 2024 FM Nirmala sitharaman saree : 2024- 25 या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यासाठी गुरुवारी सकाळीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण त्यांच्या घरातून निघाल्या आणि माध्यमांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या. अर्थसंकल्प सादर होण्याच्या काही तास आधी, सीतारमण अर्थमंत्रालयामध्ये (Finance Ministry) पोहोचल्या. यावेळी त्यांच्या हाती असणाऱ्या अर्थसंकल्पानं तर नजरा वळवल्या, पण अधिक चर्चा झाली ती म्हणजे त्यांच्या पेहरावाची.
आतापर्यंत पाच वेळा सीतारमण प्रत्येक वेळी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेत आल्या तेव्हातेव्हा त्यांची साडीही कायमच चर्चेचा विषय ठरली आणि यंदाचं अर्थात त्यांचं अर्थसंकल्प सादर करण्याचं सहावं वर्षही त्यास अपवाद ठरत नाहीये. (Interim Budget 2024) अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यासाठी पोहोचलेल्या सीतारमण यांनी यावेळी निळया (इंडिगोकडे झुकणाऱ्या) रंगाच्या साडीमध्ये दिसला. तसर सिल्क प्रकारच्या या साडीवर ऑफ व्हाईट रंगाची फुलांची रचना आणि पानांची डिझाईन अर्थात कांथा वर्क पाहायला मिळालं.
#WATCH | Finance Minister Nirmala Sitharaman carrying the Budget tablet arrives at Parliament, to present the country's interim Budget pic.twitter.com/yMLD10p3aK
— ANI (@ANI) February 1, 2024
निर्मला सीतारमण यांचं भारतीय वस्त्रोद्योग आणि स्थानिक साड्यांच्या प्रकारावर किती प्रेम आहे हे वेळोवेळी पाहायला मिळालं आहे. मागच्याच वर्षी त्यांनी अर्थसंकल्पाच्या वेळी हातमागावर तयार करण्यात आलेली लाल रंगाची इकल साडी नेसली होती. ही साडी त्यांना कर्नाटक, धारवाडचे मंत्री प्रह्लाद जोशी यांनी दिली होती.
सीतारमण यांच्या आवडत्या रंगांविषयी सांगावं तर, ऑफ व्हाईट रंगाला त्यांची विशेष पसंती असते. त्या अनेकदा या रंगसंगतीच्या साड्यांमध्ये पाहायला मिळतात. 2021 च्या अर्थसंकल्पाच्या वेळी त्यांनी लाल आणि ऑफ व्हाईट छटा असणाऱ्या पोचमपल्ली साडीला पसंती दिली होती. तर, 2022 मध्ये त्यांनी करड्या रंगाची बोमकाई साडी नेसली होती. 2020 मध्ये सीतारमण यांनी बारीकशी निळ्या रंगाची किनार असणारी पिवळी रेशमी साडी नेसण्याला प्राधान्य दिलं होतं. तर, 2019 मध्ये अर्थसंकल्प मांडतेवेळी त्यांनी सोनेरी काठ असणाऱ्या गुलाबी मंगलगिरी साडीला पसंती दिली होती. हातमागावरील साड्या या निर्मला सीतारमण यांच्या स्टाईल स्टेटमेंटचा महत्त्वाचा भाग असून, त्यांच्या साड्यांची एकंदर पसंती पाहता त्या कायमच आपल्या पेहरावातूनही वेगळेपण सिद्ध करताना दिसतात असं म्हणायला हरकत नाही.