श्रद्धा कपूरच्या गाण्यावर चक्क म्हशीने धरला ठेका : VIDEO

सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ 

Updated: Jul 11, 2021, 07:10 AM IST
श्रद्धा कपूरच्या गाण्यावर चक्क म्हशीने धरला ठेका : VIDEO  title=

मुंबई : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. मात्र काही व्हिडीओ हे अगदी हटके असतात. ज्या व्हिडीओ बनवणाऱ्याचं देखील कौतुक वाटतं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका म्हशीचा डान्स आहे. या व्हिडीओला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. 

म्हैस चक्क श्रद्धा कपूरच्या प्रसिद्ध गाण्यावर ठेका धरून नाचत आहे. महत्वाचं म्हणजे या म्हशीचा डान्स अनोखा आहे. हा व्हिडीओ पाहताना तुम्ही हसू आवरू (Funny Video) शकणार नाही, हे नक्की. (Buffalo Dance Viral on Shraddha Kapoors famous song you will laugh after watching VIDEO)

हा व्हिडीओ फेसबुक असो वा यूट्यूब सगळीकडेट हिट ठरला आहे. या व्हिडीओत एडिटिंगची देखील एक वेगळीच कमाल आहे. त्यामुळे या व्हिडीओची चर्चा चांगलीच रंगली आहे. 

श्रद्धा कपूर बॉलिवूडमधील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. प्रत्येक वेळी ती तिच्या अभिनयानं सर्वांची मन जिंकते. श्रद्धाने खूप कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. श्रद्धाने 'तीनपत्ती' या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली. तेव्हापासून आतापर्यंत श्रद्धा एका विशिष्ठ स्थानावर पोहोचली आहे. श्रद्धा आज कोटींच्या मालमत्तेची मालक बनली आहे.

श्रद्धा कपूरने आपल्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात २०१० पासून केली. अभिनयाबरोबरच ती बर्‍याच ब्रँडला एन्डोर्स करत आहे. श्रद्धा आजच्या काळात कोटींची मालकिन बनली आहे. आज आम्ही तुम्हाला श्रद्धा कपूरच्या नेट वर्थविषयी सांगणार आहोत.