भाजपच्या विरोधात समविचारी पक्षांची मोट, पवार-नायडू- अब्दुला यांच्यात चर्चा

भाजपच्या विरोधात समविचारी पक्षांची मोट बांधून तिसरी आघाडी उभी करण्याचे प्रयत्न.

सुरेंद्र गांगण | Updated: Nov 1, 2018, 05:48 PM IST
भाजपच्या विरोधात समविचारी पक्षांची मोट, पवार-नायडू- अब्दुला यांच्यात चर्चा title=

नवी दिल्ली : भाजपच्या विरोधात समविचारी पक्षांची मोट बांधून तिसरी आघाडी उभी करण्याचे प्रयत्न राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा सुरू झालेत. आज चंद्राबाबू नायडू, शरद पवार आणि डॉ. फारूख अब्दुल्ला यांच्यात बैठक झाली. यावेळी काँग्रेससह सर्व बिगर भाजप राजकीय पक्षांची व्यापक बैठक लवकरच दिल्लीत घेण्यात येणार आहे.

तेलगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नॅशनल कॉन्फरन्सचे डॉ. फारूख अब्दुल्ला यांच्यात यासंदर्भात आज एक बैठक झाली. त्यानंतर नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन, त्यांच्याशी देखील चर्चा केली. 

Telangana CM Chandrababu Naidu meets Rahul Gandhi amid seat-sharing talks for Assembly polls

भाजपच्या राजवटीत देशातील परिस्थिती चिंताजनक बनली असून, देश वाचवण्यासाठी काँग्रेससह सर्व बिगरभाजप राजकीय पक्षांची व्यापक बैठक लवकरच दिल्लीत बोलावण्यात येणार आहे. चंद्राबाबू नायडू हे या भाजपविरोधी आघाडीचे निमंत्रक असणार आहेत.