मुंबई : जवानांना लष्करी कारवायांदरम्यान आधुनिक हेल्मेट द्यावे अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात होती. अखेर केंद्र सरकारने कानपूरमधील एमकेयू लिमिटेड या कंपनीला बुलेटप्रूफ हेल्मेटचे कंत्राट दिले आहे.
भारतीय सैन्यातील जवान सध्या जुन्या काळातील हेल्मेटचा वापर करत होते. पण हे हेल्मेट शत्रूंच्या गोळीपासून संरक्षण करण्यासाठी सक्षम नव्हते. हेल्मेटमध्ये जवानाचं डोकं पूर्णपणे सुरक्षित राहील याची खात्रीही नव्हती तसेच डोक्याच्या मागच्या बाजूला संरक्षण नव्हते. या हेल्मेटचे वजनही सुमारे अडीच किलो होते.
संरक्षण मंत्रालयासोबत झालेल्या १८० कोटी रुपयांच्या करारानुसार कंपनी सैन्याला १ लाख ६० हजार बुलेटप्रूफ हेल्मेट देणार आहे. पहिल्या टप्प्यातील हेल्मेट सैन्याकडे सुपूर्त करण्यात आले आहेत. या हेल्मेटमध्ये नाईट व्हिजन डिव्हाईस आणि कम्यूनिकेश डिव्हाईस लावणे शक्य होणार आहे. सैन्याला दिलेले हेल्मेट ९ मिलीमीटर गोळीचा मारा सहन करु शकतील असे कंपनीने सांगितले आहे.