Post Office च्या या स्किममध्ये 10 हजार गुंतवा अन् तब्बल 16 लाख मिळवा; फक्त करा एवढे काम

तुम्हालाही विना रिस्क चांगला नफा हवा असेल तर, आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका उत्तम बचत योजनेबाबत माहिती देणार आहोत. जाणून घेऊ या. 

Updated: Oct 21, 2021, 12:04 PM IST
Post Office च्या या स्किममध्ये 10 हजार गुंतवा अन् तब्बल 16 लाख मिळवा; फक्त करा एवढे काम title=

मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूक म्हणजेच रिस्क आणि मोठा नफा या दोन्ही गोष्टी घडू शकतात. मार्केटमध्ये रिस्क घेण्याच्या क्षमतेनुसार गुंतवणूकदार गुंतवणूक करीत असतात. परंतु हे सर्वांनाच शक्य होते असे नाही. त्यामुळे रिटेल गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असतात. 
जर तुम्हालाही विना रिस्क चांगला नफा हवा असेल तर, आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या एका उत्तम बचत योजनेबाबत माहिती देणार आहोत. जाणून घेऊ या. 

पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉजिट योजना (Post Office Recurring Deposit)
पोस्ट ऑफिस RD डिपॉजिट अकाउंट चांगल्या व्याजासह सरकारी गॅरंटीची हमी देते. यामध्ये तुम्ही फक्त 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. कमीत कमी पैशांनीदेखील तुम्ही गुंतवणूक करू शकता. गुंतवणूकीची कमाल मर्यादा नाही. तुम्ही हवे तेवढे पैसे गुंतवू शकता. जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही हे अकाउंट सुरू करू शकता.

या योजनेसाठी अकाउंट 5 वर्षांसाठी ओपन करण्यात येते. बँक सहा महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्षांसाठी रिकरिंग डिपॉजिटची सुविधा देते. रिकरिंग डिपॉजिट स्किममध्ये सध्या 5.8 टक्क्यांचा व्याजदर सुरू आहे. हे दर 1 एप्रिल 2020 पासून लागू करण्यात आले आहेत. 

10 हजार प्रतिमहिना गुंतवणूकीवर मिळणार 16 लाख 
जर तुम्ही दर महिन्याला पोस्ट ऑफिसच्या RD स्किममध्ये 10 हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक केली तर 10 वर्षानंतर 5.8 टक्क्यांच्या व्याजदरानुसार 16 लाख किंवा त्याहून अधिक रक्कम परतावा म्हणून मिळू शकते.