मुंबई : धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवसात सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. आज धनत्रयोदशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात सराफाच्या दुकानात मोठी गर्दी असते. या दिवशी अनेकदा सोनं खरेदी करताना गोंधळ होतो. आपण खरेदी केलेले सोनं आणि चांदी योग्य आणि खरं आहे का असा प्रश्न अनेक ग्राहकांना पडतो. अशावेळी शुद्ध सोनं, चांदी खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
सोनं- चांदी जेवढं शुद्ध असेल तेवढी त्याची किंमत अधिक असते. त्यामुळे सर्वात अगोदर आपण दुकानादाराला हे सोनं किती कॅरेटचं आहे? हा प्रश्न विचारतो. 24 कॅरेटचं सोनं हे 99.99 टक्के शुद्ध असतं. हे सोनं अतिशय नरम असते यामुळे दागिने बनवण्यासाठी यामध्ये थोडं मिश्रण करावं लागतं. 22 कॅरेटच्या सोन्यात 2 टक्क्यांचे मिश्रण असते. यामुळे सोन्याचे दागिने आणि दुसऱ्या गोष्टी तयार केल्या जातात. 18 कॅरेट सोन्यात 25 टक्के तांबे किंवा चांदी मिसळली जाते. याचप्रकारे 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्धता होते.
1) प्रत्येकवेळी सोनं खरेदी करताना हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करा.
2) प्रत्येकवेळी सोनं, चांदी आणि ज्वेलरी खरेदी करताना कॅश मेमो नक्की मांगा. यामुळे भविष्यात होणाऱ्या असुविधामुळे बचाव होऊ शकतो.
3) कॅश मेमोमध्ये कायम सोनं किती कॅरेटचं आहे आणि त्यामध्ये किती शुद्धका आहे याची नोंद ठेवा.
4) ब्यूरो ऑफ इंडियन स्टंडर्डने फक्त 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटचे सोन्याला मंजुरी दिली आहे.
5) प्रत्येक सोन्याच्या खरेदीवर हॉलमार्किंगवर 35 रुपये आणि जीएसटी आकारले जाते.
6) जर तुम्हाला शंका असेल तर जवळपास असलेल्या हॉलमार्किंग सेंटरमध्ये जाऊन त्याची तपासणी करू शकता.
7) देशभरात 700 हॉलमार्किंग सेंटर असून याची यादी आपण bis.org.in वर पाहू शकता.