मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळे व्हिडीओ पाहायला मिळतात. हे व्हिडीओ आपलं मनोरंजन करतात. तर काही व्हिडीओ हे आपल्यासाठी उदाहरण म्हणून समोर येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका अपघाताचा आहे, परंतु हा अपघात चालकाच्या आणि गाडितील लोकांच्या चुकीमुळे झाला आहे. त्यामुळे जर या लोकांनी अशी चुक केली नसती. तर हा अपघात टळला असता.
तसे पाहाता दुसऱ्याच्या चुकीमुळे झालेले अपघात टाळता येत नाहीत. परंतु आपण स्वत:जर अलर्ट राहिलो किंवा तशी चुक केली नाही, तर हे अपघात रोखू शकतो हे नक्की.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ देखील असाच आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, कसा या गाडीतील लोकांच्या चुकीमुळे गाडी डिवायडरला जाऊन ठोकली.
मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक पांढऱ्या रंगाची कार अनियंत्रितपणे डिवायडरवर आदळताना दिसत आहे. खरंतर त्याच्या आत बसलेल्या व्यक्ती दरवाजा उघडून बाहेरच्या दिशेला झुकला, ज्यामुळे गाडीचा तोल गेला आणि टर्निंगच्यावेळी गाडीपूर्णपणे डिवायडरवर चढली आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पोहोचली.
या गाडीतील लोकांचं नशीब फारच चांगलं होतं की, त्यांना या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
#WATCH | HP: A video went viral showing a car jumping over a divider & colliding with railing on NH-5 in Solan; a resident from Amritsar tried performing stunts while rash driving. Vehicle damaged but driver safe. Case filed u/s 279 of IPC in Dharampur PS: Solan Police (25.07) pic.twitter.com/o5ajWRJuiG
— ANI (@ANI) July 25, 2022
ही कार चंदीगडची असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेच्या वेळी कारच्या मागील सीटवर दोन मुलीही बसल्या होत्या. यामध्ये सर्वांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.
या अपघाताचा व्हिडिओ कारमध्ये मागून येणाऱ्या व्यक्तीने बनवला आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी चालक आणि स्टंटमनवर कारवाई करत त्यांना अटक केली. यासोबतच तो दारू पिऊन गाडी चालवत होता का, याचाही तपास सुरू आहे.