Unknown Disease : छत्तीसगडमध्ये अज्ञात आजाराचे थैमान; दोन वर्षांत 61 ग्रामस्थांचा मृत्यू

Unknown Disease : धक्कादायक आणि संतापजनक म्हणजे इतकं होऊनही आरोग्य यंत्रणेला या गंभीर अज्ञात आजाराबाबत गांभीर्य नाही.

Updated: Aug 6, 2022, 11:45 PM IST
Unknown Disease : छत्तीसगडमध्ये अज्ञात आजाराचे थैमान; दोन वर्षांत 61 ग्रामस्थांचा मृत्यू title=

रायपूर : कोरोना महामारीमुळे अनेक जणांना आपल्या जीवाला मुकावं लागलं. भारतात असंख्य लोकांचा मृत्यू झाला. मात्र  छत्तीसगडमध्ये (chhattisgarh) अज्ञात अशा एका आजाराने थैमान घातलंय. हा आजार इतका भयंकर आहे की 2 वर्षात तब्बल 61 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. धक्कादायक बाब अशी, की मृत पावलेले 61 जण हे एकाच गावातील असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे या अज्ञात आजारामुळे गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण आहे. (chhattisgarh sukuma district 61 villagers died in 2 years due to unknown disease)

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील कोंटा ब्लॉकमधील रेगडगट्टा गावात या आजाराने दहशत माजवलीय. या आजारामुळे सातत्याने गावकऱ्यांचा मृत्यू होतोय. या आजारामुळे 2 वर्षात तब्बल 61 जणांनी जगाचा निरोप घेतल्याचं म्हटलं जात आहे. 

या आजारामध्ये हातापायाला अचानक सूज येऊन मृत्यू होत असल्याचं सांगितलं गेलंय.  याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं असून आरोग्य विभागानं तपास सुरू केलाय. सुकमाचे जिल्हाधिकारी हरीश एस यांनी आरोग्य कर्मचारी आणि तज्ज्ञांची टीम गावात पाठवली आहे. प्राथमिक तपासणीत एकाच कारणामुळे मृत्यू आढळले नसल्याचं समोर आलंय. याबाबत अधिक तपास करण्यात येतोय.