मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडिओ खुपच चर्चेत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. या व्हिडिओत चिंपांझी माकडाची कृती पाहून हसू येतेय, त्याचबरोबर त्याच्या माणूसकीचे कौतुक होतेय.
व्हायरल व्हिडिओत काय?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक चिंपांझी पाण्याच्या काठावर बसला होता. या चिंपांझीच्या बाजूला एक भांड आहे, या भांड्यात खाण ठेवले आहे. चिंपाझी पाण्यातील माशांना बघतो आणि त्यांचा आनंद लुटत असतो. तसेच एखादा मासा दिसला की लगचे जवळच्या भांड्यातून अन्न काढून पाण्यात टाकायचा जेणेकरून मासे ते खातील.
Feeding the fish.. pic.twitter.com/tFVz55frZx
— Buitengebieden (@buitengebieden) June 17, 2022
हा व्हिडिओ चिंपांझीची माणूसकी दाखवत आहे. एक प्राणी असताना दुसऱ्या प्रजातीच्या प्राण्याबाबत इतकी आपुलकी दाखवत असल्याने या चिंपांझीचे कौतुक होत आहे. तसेच माणसं अनेकदा पाण्यात बसून मासे पकडताना दिसतात, तर हा चिंपांझी त्यांच्याशी मैत्री करून त्यांची काळजी घेत आहे. चिंपांझीला अशा प्रकारे माशांची काळजी घेताना पाहणे हा एक वेगळाच अनुभव आहे.त्यामुळे हा व्हिडिओ खुप चर्चेचा विषय ठरतोय.
दरम्यान हा व्हिडिओ पाहून तमाम नेटकरी या लाडक्या चिंपांझीचे फॅन झाले आहेत. आतापर्यंत 252 हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तर 35 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाइक केला आहे.