Mongoose VS Cobra: भर रस्त्यात मुंगूस आणि कोब्राची झुंज, थराराक दृश्य कॅमेऱ्यात कैद

साप आणि मुंगूसचं वैर सर्वश्रूत आहे. दोघं एकमेकांसमोर आले तर झुंज होणार हे निश्चित असतं.

Updated: Jun 8, 2022, 05:09 PM IST
Mongoose VS Cobra: भर रस्त्यात मुंगूस आणि कोब्राची झुंज, थराराक दृश्य कॅमेऱ्यात कैद title=

मुंबई: सोशल मीडियावर कायमच व्हायरल व्हिडीओची चर्चा होत असते. रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. वन्यप्राण्यांचे व्हिडीओ म्हटलं की नेटकऱ्यांचा जीव की प्राण. पण सापाचे व्हिडीओ म्हटलं की व्हिडीओ बघतानाच थरकाप उडतो. कोब्रा प्रत्यक्षात समोर आला तर सांगायलाच नको. दुसरीकडे साप आणि मुंगूसचं वैर सर्वश्रूत आहे. दोघं एकमेकांसमोर आले तर झुंज होणार हे निश्चित असतं. या दोघांमध्ये मुंगूस हा वरचढ असतो, हे आपण अनेक व्हायरल व्हिडीओतून पाहिलं आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात एक कोब्रा भर रस्त्यात फना काढून बसल्याचं दिसत आहे. तर मुंगूस त्याच्याशी झुंज करण्यासाठी सज्ज असल्याचं दिसत आहे.

व्हिडीओमध्ये एक कोब्रा रस्त्याच्या मधोमध फणा काढून असल्याचं दिसत आहे. अशा स्थितीत मुंगूसची एन्ट्री होते आणि तो कोब्राशी झुंज करण्याचा प्रयत्न करू लागतो. रस्त्याच्या मधोमध दोघेही एकमेकांना भिडतात. उड्या मारत उड्या मारत एकमेकांना मारू लागतात. दोघांपैकी कोणीही हार मानायला तयार नसल्याचं दिसतं. रस्त्यावर उपस्थित असलेले लोक दुरूनच वाहनांवर बसून हे दृश्य पाहतात. मात्र कोणीही पुढे येण्याचे धाडस करत नाही. मात्र साप आणि मुंगूसची झुंज मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित करतात. अखेर मुंगूस त्या सापाला मारतो आणि जंगलात घेऊन जातो.

कोब्रा आणि मुंगूसचा हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत 4,000 हून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसेच नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत आहे. एका युजर्सने लिहिलं आहे की, अशी झुंज मी यापूर्वी कधी पाहिली नव्हती. तर दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, अखेर मुंगूस जिंकला.