अयोध्या निकालाआधी काँग्रेसची महत्वाची बैठक, सोनिया-राहुल गांधी उपस्थित

राम मंदिर जमीन वाद्यावर (Ram Mandir) आज सर्वोच्च नियालय निर्णय देणार आहे.  

Updated: Nov 9, 2019, 09:11 AM IST
अयोध्या निकालाआधी काँग्रेसची महत्वाची बैठक, सोनिया-राहुल गांधी उपस्थित

नवी दिल्ली : राम मंदिर जमीन वाद्यावर (Ram Mandir) आज सर्वोच्च नियालय निर्णय देणार आहे. त्याआधी काँग्रेसने आपल्या कार्यसमितिची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे. राम मंदिर प्रकरणावर पक्षाची काय भूमिका असावी, याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. एकच भूमिका ठरविण्यासाठी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

अयोध्या प्रकरण निकाल : समाजमाध्यमांवर नजर 

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी या कार्यसमितिची बैठक बोलावली असून यात ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत. तसेर राहुल गांधी हेही दिल्लीत आले आहेत. ही बैठक रविवारी संध्याकाळी ४.३० वाजता होणार होती. मात्र, ती आता होणार नाही. 

अयोध्या प्रकरणात सकाळी १०.३० वाजता सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद प्रकरणात सुणावणी होणार आहे. या सुनावणीकडे देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा निकाल हा मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई सेवानिवृत्त होण्यापूर्वी येणार आहे.