Karnataka COVID-19 Guidelines: कोरोनाचा (Corona) संभाव्य धोका लक्षात घेता कर्नाटक सरकारनं (Karnataka Government) शाळा, कॉलेज, सिनेमागृह पब आणि बारमध्ये मास्कसक्ती (Mask Mandatory) केली आहे. तसंच नवीन वर्षाच्या स्वागतासाठीही नियमावली जारी करण्यात आलीय. चीनमध्ये कोरोना (China Corona) रूग्णांची संख्या झपाट्यानं वाढतेय. नव्या व्हेरियंटवरून आरोग्य मंत्रालयानेही सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कर्नाटक सरकारनं शाळांमध्ये मास्क घालणं तसच सॅनिटायझरचा (Sanitizer) वापर बंधनकारक केलाय. याशिवाय लसीकरणासाठीही (Vaccination) कडक पावलं उचलण्यात आलीयेत. ज्यांनी दोन डोस घेतले आहेत. त्यांनाच सिनेमागृह, पबमध्ये प्रवेश दिला जाईल असं कर्नाटक सरकारने जाहीर केलंय.
कर्नाटक आरोग्य विभागाची तातडीची बैठक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने नविन गाईडलाईन्स (Guidlines) जारी केली आहे. कर्नाटक आरोग्य विभागाने राजधानी बंगळुरुमध्ये तातडीची बैठक घेतली. या बैठकीनंतर कर्नाटक सरकारने परदेशातून आलेल्या प्रवाशांसाठी बंगळुरु आणि मंगळुरुमध्ये दोन रुग्णालयं सर्व सुविधांनी युक्त करण्यास सांगतिलं आहे. या रुग्णालयात परदेशातून आलेल्या नागरिकांची टेस्टिंग केली जाणार आहे. याशिवाय बंद थिएटरमध्ये मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. शाळा-कॉलेजमध्येही मास्क सक्ती असणार आहे.
शाळा-कॉलेजमध्ये सॅनिटायझरची व्यवस्था करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या लसीकरणं होणं गरजेचं आहे. कोणत्याही शाळा किंवा कॉलेजमध्ये लसीकरण न झालेला विद्यार्थी आढळला तर त्या शाळा-कॉलेजवर कारवाई होऊ शकते. नव वर्ष स्वागतच्या पार्श्वभूमीवर रेस्टॉरंटमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. इतकंच नाही तर 31 पार्टीला केवळ 1 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
चीनसह जगभरात कोरोनाचं थैमान
चीनमध्ये कोरोनामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होतेय. चीनसह अमेरिका, फ्रान्स, दक्षिण कोरिया, जपानमध्ये कोरोना रुग्णवाढ वेगानं होत असून, आरोग्य यंत्रणा अपुरी पडतेय. चीनच्या बीजिंगमधील गोदामांमध्ये 15 हजार मृतदेहांचा खच पडलाय. यामुळे कोरोना मृतांची अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा आहे. ऑक्सिजनची कमतरता हीदेखील चीनमधील एक मोठी समस्या आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढत असल्याचे सांगण्यात येते. हा आकडा दहा लाखांवर जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, रक्ताचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे...चीनची लसही फायदेशीर ठरत नसल्याने मोठं संकट चीनवर ओढावलंय.