मुंबई : अनेक महिन्यांपासून गर्भवती आणि स्तनदा मातांनी कोरोना लस घ्यावी की नाही, याबाबत अनेक समज गैरसमज निर्माण करण्यात आले. त्यामुळे स्तनदा आणि गर्भवतींमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. याबाबत केंद्र सरकारने खुलासा केला आहे. या महिलांसाठी कोव्हॅक्सिन (Covaxin), कोव्हीशिल्ड (Covishield), स्फुटनिक व्ही (Sputnik V) आणि मॉर्डना (Moderna) लस सुरक्षित असल्याचं नीति आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल (Dr. VK Paul) यांनी स्पष्ट केलं आहे. (Corona vaccine is safe for pregnant women and there is no danger to breastfeeding mothers, says central government)
डॉक्टर पॉल काय म्हणाले?
"गर्भवती महिलांच्या लसीकरणासाठी (Corona Vaccination) लवकरच नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. गर्भवतींसाठी व्हॅक्सीन पूर्णपणे सुरक्षित आहे. आरोग्य विभागाकडून याची पुढे चाचणी केली जात आहे. मॉर्डना लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे, असं डॉक्टर पॉल यांनी स्पष्ट केलं.
मॉडर्नाच्या आपात्कालीन वापरासाठी मंजूरी
डॉक्टर पॉल पत्रकार परिषदेत म्हणाले की, "आपत्कालीन वापरासाठी मॉडर्नाच्या लसीला परवानगी मिळाली आहे. मर्यादित वापरासाठी ही मंजुरी देण्यात आली आहे. आता देशात कोव्हीशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्फुटनिक व्ही आणि मॉडर्ना या चार लस उपलब्ध आहेत. आम्ही लवकरच फायझरशी करार करणार आहोत”, अशी माहितीही पॉल यांनी दिली.
संबंधित बातम्या :
दिलासादायक ! भारतात लवकरच मॉर्डना व्हॅक्सिन
Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ की घट? पाहा आकडेवारी