भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा १४ हजार पार; बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ

आतापर्यंत देशात 1992 लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. 

Updated: Apr 18, 2020, 11:15 AM IST
भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा १४ हजार पार; बरे होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसचा कहर सुरु आहे. देशात कोरोना संसर्गग्रस्तांची संख्या वाढत असून कोरोना रुग्णांची संख्या 14 हजार 378वर पोहचली आहे. आतापर्यंत देशात 480 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 1992 लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. 

- भारतीय नौसेनेतील (Indian Navy) २१ जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. नौसेनेतील INS आंग्रे बेसवर कोरोनाचं पहिलं प्रकरण 7 एप्रिल रोजी समोर आलं होतं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. INS आंग्रे पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आलं आहे.

- महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 3205 इतकी झाली आहे. आतापर्यंत 194 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 300 कोरोनाग्रस्त बरे झाले आहेत. 

- एकट्या मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 2085वर गेली आहे. तर 122 लोकांचा मृत्यू झाला आहे. धारवीत कोरोना रुग्णांची संख्या 100वर पोहचली आहे. धारावीमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

- राजधानी दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या 1640 इतकी झाली आहे. आतपर्यंत दिल्लीत 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 55 जण बरे झाले आहेत.

- जगभरात आतापर्यंत 22 लाखांहून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1.5 लाखांहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात 5 लाख 72 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत.