मुंबई : कोरोनाचे मोठे संकट आहे. या संकटावर मात कशी करायची आणि देशाची आर्थिक घडी कशी बसवायची यावर काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी अनेक अर्थतज्ज्ञांशी चर्चा करत आहेत. याआधी रघुराम राजन यांच्याशी चर्चा केली होती. आता त्यानंतर नोबेल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी यांच्याशी राहुल यांनी संवाद साधला. यावेळी अभिजीत यांनी लोकांना आर्थिक मदत द्या, कर्जही माफ करण्याची गरज आहे, असा सल्ला दिला.
कोरोना विषाणूच्या साथीमुळे देशात लॉकडाऊन आहे आणि अर्थव्यवस्था मंदावली आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी नोबेल पुरस्कार विजेते अभिजीत बॅनर्जी यांच्याशी संवाद साधला. या दोघांनी कोरोना संकटातून बाहेर पडताना अर्थव्यवस्थेतील आव्हानांबाबत चर्चा केली. अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी यावेळी सल्ला दिला की, लोकांच्या हातात रोख रक्कम पोहोण्याची गरज आहे, अशा वेळी एखाद्याने कर्ज माफ करावे आणि रोख मदत करावी.
राहुल गांधींनी अभिजीत यांना विचारले, नोबेल पारितोषिक जाहीर झाले त्यावेळी तुम्हाला काय वाटले, हा पुरस्कार मिळेल, असे वाटले होत का? या प्रश्नावर अभिजीत यांनी उत्तर दिले, मी असा असा विचार कधीच केला नव्हता.
अभिजीत बॅनर्जी म्हणाले की, यूपीए सरकारने खूप चांगली धोरणे राबविली होती, पण आता तसे होताना दिसत नाही. हे सरकार ती धोरणे राबवत नाही. आधारसारखी योजना जी यूपीए सरकारने राबविली, या सरकारनेही ती योग्यच असल्याचे सांगितले आणि त्यावर कार्य केले. आजच्या काळात अशी सुविधा अगदी योग्य असल्याचे सिद्ध होऊ शकते, परंतु ती करता आलेली नाही. म्हणजेच राष्ट्रव्यापी योजना लागू केलेली नाही.
राहुल गांधी यांनी संवाद साधताना म्हटले, आज रोख रक्कम अडचणीची ठरणार आहे, बँकांसमोर अनेक आव्हाने असतील आणि नोकरी वाचवणे कठीण होईल. यावर अभिजीत यांनी सांगितले, हे अगदी खरे होण्याची शक्यता आहे. तसे होत आहे. अशा परिस्थितीत देशात आर्थिक पॅकेजची आवश्यकता आहे. अमेरिका आणि जपानसारख्या देशांनी हे केले आहे, परंतु तसे आपण केलेले नाही. छोट्या उद्योगांना मदत करावी, या तिमाहीत कर्ज देयके माफ करण्याची गरज आहे.
- लॉकडाऊनमधून जितक्या लवकर बाहेर पडू ते अधिक चांगले असेल. त्यानंतर नवीन योजना आखण्याची गरज आहे. तसा प्लान हवा. अन्यथा सगळा पैसा वाया जाईल
- कोरोना महामारीबाबत माहिती होण्याची गरज आहे. साथीच्या रोगाबद्दल आपल्याला माहिती असली पाहिजे, लॉकडाऊन वाढवून काहीही होणार नाही.
- सरकारला याआधीच सल्ला दिला आहे. लोकांना रेशन उपलब्ध करुन दिले पाहिजे. किमान तीन महिने यावर काम केले पाहिजे. तसेच प्रत्येकाला मोफत रेसन देण्याची गरज आहे. प्रत्येकाला तांदूळ, गहू, साखर यांची जरुरी आहे.
- प्रत्येकापर्यंत पैसे पोहोचण्याची गरज आहे. त्यासाठी एक चांगले वातावरण असले पाहिजे. ज्याच्याजवळ बँक खाते नाही. त्यांच्याकडे काहीही नाही, त्यांचा विचार केला पाहिजे.
- राज्य सरकारांना मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे सर्व लोकांपर्यंत मदत पोहोचण्यास मदत होईल. राज्य सरकार अधिक मदत देतात, जेव्हा असे केले जाते तेव्हा सामान्य लोकांपर्यंतचे पैसे येतात.
- केंद्र सरकारने काही अधिकार हे राज्य सरकारला दिले पाहिजेत. केंद्राने गरीब कामगारांसाठी नवीन योजना आखण्याची गरज आहे. राज्ये आणि जिल्हा प्रशासनाने गरीब नागरिकांना थेट लाभ मिळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.