चांगली बातमी । देशात कोरोना मृत्यू दरात घट, रुग्णसंख्याही मंदावली

कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी सरकारे नियम अधीक कठोर केले आहेत.

Updated: Jul 5, 2021, 10:07 AM IST
चांगली बातमी । देशात कोरोना मृत्यू दरात घट, रुग्णसंख्याही मंदावली title=

मुंबई : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचे संकेत वर्तवण्यात येत आहे. तिसरी लाट थोपवण्यासाठी सरकारे नियम अधीक कठोर केले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे नव्या कोरोना रूग्णांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तसात 39 हजार  796 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर  42 हजार 352 रूग्ण कोरोनाच्या विळख्यातून  सुखरूप बाहेर पडले असून दिवसभरात 723 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.  बुधवारी  कोरोनाचे 43,071 रुग्ण आढळले आणि 955 कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भारतात कोरोना रूग्णांची संख्या 3,05,85,229वर पोहोचली आहे, तर कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आलेल्या रूग्णांची संख्या  2,97,00,430 आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे तब्बल 4 लाख 2 हजार 728 रूग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले  आहेत. तर सध्या 4 लाख 82 हजार 71 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 

देशातील कोरोनामुळे होणारं मृत्यूचं प्रमाण 1.31 टक्के आहे. तर एक्टिव्ह प्रकरणं 2 टक्क्यांपेक्षा कमी आहेत. एक्टिव्ह प्रकरणांच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरात अमेरिका आणि ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात आहेत.