नवी दिल्ली : सोशल मीडियाचा वापर लाभदायक असला तरी तितकाच घातक असल्याची शक्यता नाकारता येत नाही. आजच्या स्पर्धेच्या युगात लवकरात लवकर संपर्क साधण्यासाठी सोशल मॅसेंजिंग ऍप Whatsappचा वापर सर्रास होत आहे. परंतु Whatsapp वापर करणाऱ्यांसाठी भारतीय स्टेट बँक (SBI)ने काही अलर्ट जारी केले आहेत. एसबीआयने जारी केलेल्या अलर्टनुसार Whatsappवरील तुमची व्हॉट्सअॅपवर केलेली छोटी चूक तुमच्या बँक खात्यात अडथळा आणू शकते. सध्या सायबर गुन्हेगारांनी Whatsappचा वापर करून नागरिकांच्या बँकेतील पैसे लंपास करण्यावर भर दिला आहे.
Customers are now being targeted on WhatsApp. Don't let cyber criminals fool you! Please be aware and stay vigilant. #SBI #StateBankOfIndia #CyberCrime #SafetyTips #CyberSafety pic.twitter.com/tfLTD6T152
— State Bank of India (@TheOfficialSBI) September 27, 2020
कोरोना काळात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे भारतीय स्टेट बँक (SBI) ग्राहकांना सतर्क राहण्याचा इशारा ट्विटरच्या माध्यमातून दिला. सायबर गुन्हेगार सध्या Whatsappच्या माध्यमातून ग्राहकांना टारगेट करत आहेत. खोटे मेसेज पाठवून ग्रहकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सायबर गुन्हेगार करत असल्याचं सांगत SBIने ग्राहकांना अलर्ट केलं आहे.
सद्यस्थितीला सायबर गुन्हेगार एखादी लॉटरी जिंकण्याचा मेसेज करत ग्राहकांची फसवणूक करून त्यांची वैयक्तिक माहिती गोळा करून खात्यातील सर्व रक्कम लंपास करत आहेत त्यामुळे ग्रहकांनी अशा कोणत्याही मेसेजवर उत्तर न देण्याचे आवाहन ग्राहकांना केलं आहे.